हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. आता आपल्याला कार्ड प्रोटेक्शन प्लान घेता येणार आहे.
हा प्लान म्हणजे इंश्योरन्स सारखाच आहे. यामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड सोबत रिटेल स्टोअर कार्ड, लॉयल्टी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड यांचाही समावेश आहे. सर्व बँका आपल्या ग्राहकांना या सेवा देत आहेत. छोटीशी रक्कम भरून हा प्लान रिन्यू करता येतो. पाकीट हरवले तर एका नंबरवर कॉल केल्यास लगेच सगळे कार्ड ब्लॉक केले जातात. याच वेळेला आपल्याला मदत ही मिळते. या कार्डचे अनेक फायदे आहेत.
कुठे बाहेर फिरायला गेले असता पाकीट हरवले असता या प्रोटेक्शन प्लान च्या माध्यमातून आपल्या हॉटेलचा खर्च करता येतो. या परिस्थितीत जर तिकीट खरेदी करायचे पैसे नसतील तर या प्लानद्वारे तिकीटही काढता येऊ शकते. अर्थात या सेवा बँक योजनांवर आधारित असतात. सीपीपी कडून सहायता रक्कम देखील मिळते. जेव्हा आपण देशातच प्रवास करत असता तेव्हा ही मदत मिळते. ही मदत मिळाल्यावर २८ दिवसांत आपल्याला ही रक्कम परत करायची असते.
हे पण वाचा –
फक्त एक SMS मोकळं करु शकतो तुमचं संपुर्ण बँक खाते; SBI ने ग्राहकांना केले अलर्ट
Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा
SBI, PNB नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने केले ग्राहकांना अलर्ट; खात्यातून पैसे चोरीला जाण्याची शक्यता
SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते
पैसे काढण्यासाठी आता ATM ची गरज नाही; ‘कॅश’ची सुद्धा होम डिलिव्हरी