‘ही’ आहे स्वस्त डिझेल खरेदी करण्याची पद्धत, दर महिन्याला मिळेल मोठा कॅशबॅक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्वात अधिक नुकसान ट्रक मालकांचे झाले आहे. संचारबंदी उठविण्यात आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. वाढत्या डिझेलच्या किंमतींनी ट्रक मालकांना समस्या निर्माण केली आहे. या समस्येपासून सुटका देण्यासाठी आयआयटियन द्वारे गुरुग्राम मध्ये उभ्या करण्यात आलेल्या टेक स्टार्टअप विल्सआय ने आपला पंप नावाने एक सेवा सुरु केली आहे.  ते ट्रक चालकांना उत्तम पेट्रोल मिळू शकेल अशी जागा सांगतात. त्याचबरोबर १% कॅशबॅक देखील मिळू शकते.

७५० पेट्रोल पंप वर ही सुविधा मिळणार आहे. यात डिझेलची खात्री असणार आहे. आणि दरमहिन्याला १ तारखेला कॅशबॅक देखील मिळणार आहे.  जेवढे डिझेल भरले आहे त्या रकमेच्या १% रक्कम परत दिली जाणार आहे.  हिन्दुस्तान पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) और रिलायंस (आरआईएल) या तीन कंपन्यांसोबत हा करार करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत ७५० पेट्रोल पंप वर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना संबंधित पेट्रोल पंपची यादी दिली जाते. ट्रक ड्राइव्हर त्या पंपावर जाऊन डिझेल भरू शकतो. बिल बनवताना आपला कोड बनवून घेऊन त्याची सूचना कंपनीच्या सेंट्रल सर्व्हर मध्ये जोडू शकतो. म्हणजे दरमहिन्याला कॅशबॅक मिळत राहते.

भारतात एक ट्रक कमीत कमी १२० किमी जातो. देशात महिन्यात एक ट्रक साधारण ३००० किमी अंतर कापतो. एक लिटर डिझेलवर ३ किमी अंतर पार करू शकतो. महिन्यला एका ट्रॅकला १०००लिटर डिझेल भरवून घ्यावे लागेल. एका वर्षात १२ हजार लिटर सध्या ८० रुपये दराने वर्षाला त्याला १० लाख रुपये खर्च आहे. १% कॅशबॅक पाहता १० हजार रुपयांची बचत होईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला ४९९ रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. मालकाकडे कितीही ट्रक असले तरी या नोंदणीत तो त्या सगळ्या ट्रक मध्ये डिझेल भरू शकतो. मोबाईल नंबर, व्हेईकल नंबर नोंद करून आपली नोंदणी करता येते. याशिवाय ९३५४-९३३-६९२ यावर कॉल करून अधिक माहिती घेता येऊ शकते.

हे पण वाचा –

1 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, व्हिडीओ बनवून जिंका बक्षीस; ‘या’ कंपनीने सुरु केला खास कॉन्सर्ट

कोरोना काळात मासिक 55 रुपये जमा केल्यावर दरमहा मिळतील 3 हजार; कसे ते जाणून घ्या

गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

हनिमूनसाठी जमवलेल्या पैशातून त्याने खरेदी केला गेमिंग पीसी 

Leave a Comment