Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया

Marriage Certificate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Marriage Certificate : लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती जवळ येणे नसून दोन कुटुंबांचीही जवळीकही आहे. मात्र लग्नाच्या बाबतीत आपण फक्त धार्मिक विधी पाळतो. मात्र याबरोबरच आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट तयार केले जाते. याद्वारे आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभही घेता देतो. मात्र आज आपण लग्नाचे प्रमाणपत्र गरजेचे का आहे आणि ते कसे बनवायचे याबाबतची माहिती जाणून घेऊया…

Marriage certificate: Objectives, benefits, documents required, and  marriage registration

Marriage Certificate आवश्यक का आहे???

यामुळे लग्न झालेल्या जोडप्याना सामाजिक ओळख मिळते. तसेच, याद्वारे आपल्या अधिकारांचे रक्षणही होते. याव्यतिरिक्त याचे इतर अनेक फायदे आहेत. तसेच जॉइंट अकाउंट, पासपोर्ट आणि कपल ट्रॅव्हल व्हिसा बनवण्यासाठी देखील मॅरेज सर्टिफिकेट खूपच उपयुक्त आहे. यासोबतच जर एखाद्या महिलेला लग्नानंतर आपले नाव बदलायचे असेल तर त्यासाठीही आधी लग्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

Marriage Registration (Bangalore) - Yourdoorstep

त्याचप्रमाणे लग्नानंतर जर जोडीदार फसवणूक करून फरार झाला तर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठीही Marriage Certificate उपयुक्त ठरते. तसेच घटस्फोटानंतर आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठीही लग्नाचे प्रमाणपत्र न्यायालयात दाखवावे लागते.

अशा प्रकारे तयार करा Marriage Certificate

मॅरेज सर्टिफिकेटसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. या पोर्टलवर, वधू-वरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, लग्नाचा फोटो, मोबाईल नऊ,बेर, दोघांचे ओळखपत्र (मतदार कार्ड किंवा आधार कार्ड), जन्मतारीख (बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, 10वी ची मार्कशीट, ड्रायव्हिंग लायसन्स), वधू-वरांचे प्रतिज्ञापत्र आणि दोन साक्षीदारांचे ओळखपत्र दाखल करावे लागेल.

Marriage Registration (Mumbai) - Yourdoorstep

Marriage Certificate तयार झाल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक अपडेट मेसेज मिळेल. ज्यानंतर वेबसाइटवर जाऊन तर डाउनलोड करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2495

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर