Sunday, May 28, 2023

कोरोनाची लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल संपूर्ण जगाचे डोळे कोरोनाच्या लसीकडे लागलेले आहेत. सध्या जगभरात 140 लसींवर काम सुरू आहे. यापैकी 23 लसी अशा आहेत ज्यांची क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही लस जगाला मिळेल, अशी अपेक्षा आहे.130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ही लस प्रत्येक व्यक्तीकडे नेणे सोपे होणार नाही. म्हणून सरकारने कोरोना लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याची योजना सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता सरकार वेगवेगळ्या एजन्सीशी वेगवेगळ्या स्तरांवर बोलणी करत आहे.

लस संदर्भात बैठक
इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार भारतीय अधिकाऱ्यांनी रसद व लस पुरवठ्याबाबत चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अनेक मंत्रालये आणि अधिकारीही सहभागी झाले होते. त्यांना आशा आहे की, पुढील वर्षाच्या सुरूवातीस काही लस येतील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्तमानपत्राने दावा केला आहे की, लस वितरणासंदर्भात आतापर्यंत किमान दोन बैठका घेतल्या गेल्या आहेत. येत्या आठवड्यात त्याबद्दल अधिक चर्चा होईल.

कोल्ड स्टोरेज बनवण्याची तयारी
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या क्षणी या लसीबाबत अंतर्गत सल्लामसलत सुरू झाली आहे जेणेकरून आम्ही पूर्णपणे तयार आहोत. वास्तविक, हे सर्व शेवटच्या प्रसंगी होणार कोणताही त्रास टाळण्यासाठी आहे. या बैठकीत मुख्य म्हणजे उत्तर-पूर्व भारतासारख्या दुर्गम भागात या लसीचे वितरण कसे करावे ही चर्चा करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सरकार अशा भागात मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजची सुविधा तयार करण्याची योजना तयार करीत आहे.

या मुद्द्यांवर चर्चा होत आहे
या लसीचे वितरण कसे करावे यावरही चर्चा सुरू झाली आहे. हे फक्त सरकारी रूग्णालयांच्या माध्यमातून दिले जावे की, खाजगी रुग्णालयेदेखील त्यात समाविष्ट केली पाहिजेत. फ्रंटलाइन किंवा देशातील वृद्ध लोक यापैकी सर्वप्रथम लसीचा डोस कोणाला देण्यात येईल या विषयावरही सरकारी अधिकारी चर्चा करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.