काही तासातच रौद्ररूप घेऊ शकते अम्फान चक्रीवादळ; ओडिशात रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगालच्या उपसागरात येणारे चक्रीवादळ अम्फान हे अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण करू शकते असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आयएमडीने याबाबत म्हटले आहे की,’ यावेळी देशात वेस्‍टर्न डिस्टरबन्स एक्टिव आहे, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही हवामान खराब होऊ शकते.

ओडिशा आणि बंगालमध्ये रेड अलर्ट जाहीर
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून चक्रीवादळ ‘अम्फान’ पुढील १२ तासांत धोकादायक रूप धारण करू शकेल, ‘आयएमडीने म्हटलं आहे की,’दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात पुढच्या १२ तासांत हे ‘अम्फान चक्रीवादळ ‘ वेगाने सरकेल आणि म्हणून ओडिशा आणि बंगालमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे.

ओडिशामध्ये एनडीआरएफची १० पथके तैनात आहेत ओडिशाच्या बालासोर, भद्रक, केंद्रापाडा, पुरी, जगतसिंगपूर, जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) १० पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ७ पथके कटकमध्ये तर ३ पथके एनडीआरएफ बीएन मुंडाली येथे तैनात आहेत. २० मे रोजी चक्रीवादळ रूप धारण करील भुवनेश्वर येथील हवामान विभाग म्हणाले की,’२० मे रोजी दुपारच्या दरम्यान ‘अम्फान’ चक्रीवादळ हे पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील हटिया बेटच्या मध्यभागी भयानक रूप धारण करेल. या चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होईल आणि जोरदार वारे वाहतील.

ओडिशा सरकारने दिला इशारा
इतकेच नाही तर ओडिशा सरकारने मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस आणि समुद्राच्या दक्षिणेकडे जाऊ नये असा सल्ला दिला आहे, तसेच समुद्राच्या या भागात गेलेल्या मच्छिमारांनाही त्वरित परत येण्यास सांगितले गेले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले- जीवितहानी होऊ देणार नाही
बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्री वादळासाठी ओडिशा सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या चक्रीवादळामुळे राज्यात कोणातीही जीवितहानी होणार नाही याची खात्री करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.