पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून मी व माझी पत्नी यांनी एकत्रितपणे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

पूजा केली आणि खोदण्यास सुरवात झाली
गजानन यांनी सांगितले की मी माझ्या पत्नीला पूजा करायला सांगितले आणि त्यानंतर आम्ही दोघेही खोदायला लागलो.आमच्या शेजार्‍यांनी आमची चेष्टा केली पण आम्ही विहीर खोदणे थांबविले नाही आणि २१ दिवसानंतर आमच्या घराच्या अंगणात एक २५ फूट खोल विहीर तयार झाली.

मुलांनीही केली मदत
गजानन म्हणाले की,२१ व्या दिवशी आम्हाला खोदताना पाणी लागले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. त्यांच्या मुलांनीही या कामात पती-पत्नीला सहकार्य केले. त्यांनी आपल्या पालकांना या कामामध्ये साथ दिली. या खोदकामासाठी या पती-पत्नीने कोणतेही यंत्र वापरलेले नाही. त्यांनी केवळ अवजारांचा वापर करून ते खोदले.

या जोडप्याने विहीर का खोदली?
आपल्या भागात पाण्याची समस्या असल्याचे गजानन यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पाणी सेवा नसल्यातच जमा आहे.म्हणून घरीच आम्ही विहीर खोदण्याचा विचार केला जेणेकरुन आम्हाला सहजपणे पाणी मिळेल. ते म्हणाले की आम्ही जो विचार केला ते आम्ही केले आणि आता आमची पाण्याची समस्याही दूर झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment