माझ्या आडनावामुळे मला ‘ते’ पद मिळाले नाही : गिरीश महाजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या विस्तार सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी एक दिलखुलास किस्सा सांगितला आहे. आडनावामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले नाही अशी खंत गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली आहे.

बार्शीत कोणाची होणार सरशी ; सोपल , राऊत लागले आमदारकीच्या कामाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मी राजकारणात आलो. भाजयुमोचा गावातील शाखेचा अध्यक्ष झालो त्यानंतर तालुका अध्यक्ष झालो. नंतर कामाचा सपाटा बघून मला भाजप युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पदी नेमले. मात्र मी भारतीय युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष बनू शकलो नाही. कारण माझं आडनाव मध्ये आले असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नावावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब ; घोषणेची औपचारिकता बाकी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस असताना मी ज्यावेळी अध्यक्ष पद पक्षाकडे मागितले तेव्हा पक्षाने मला ते दिले नाही. कारण पक्षाकडून मला सांगण्यात आले कि तुमच्या नावात फॉल्ट आहे. कारण तुमचे आडनाव बघता तुम्हाला प्रमोद महाजन यांचे नातलग समजतील त्यामुळे पक्षाबद्दल चुकीचा मॅसेज समाजात जाईल म्हणून हे पद आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. गिरीश महाजन यांनी हा जुना किस्सा सांगून आपल्या आडनावाबद्दल भाष्य केले आहे. महाजन यांच्या आडनावामुळे त्यांना राजकारणात नेहमीच अडथळा येतो. मात्र हा अडथळा आज त्यांनी स्वतः तोंडाने बोलून दाखवला आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य : गिरीश महाजन

आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी