हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी ICICI Bank एक आहे. बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या या बँकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या दोन दशकांत त्याने गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या 23 वर्षांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 220 पट वाढ केली आहे. 2000 सालच्या सुमारास ज्या गुंतवणूकदारांनी ICICI Bank च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल ते आज करोडपती झाले असतील.
NSE वर 1 जानेवारी 1999 रोजी ICICI Bank ची लिस्टिंग झाली. त्यावेळी 4.08 रुपये किंमत असलेला हे शेअर्स 8 सप्टेंबर रोजी 899.60 रुपयांवर बंद झाले. अशाप्रकारे, या शेअर्सने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 21,950 टक्के रिटर्न दिला आहे.
शेअर बाजारातील बँकेची सध्याची कामगिरी
शेअर बाजारातील ICICI Bank च्या सध्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या एका महिन्यात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या किंमती 24.90 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 208.50 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
चांगल्या रिटर्नची अपेक्षा
या बँकेच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने ICICI Bank च्या टार्गेट प्राईसमध्ये सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 35 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे त्याची किंमत 1,040 रुपयांवरून आता 1,225 रुपये झाली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/
हे पण वाचा :
आता रोजंदारीवरील मजुरांनाही मिळणार 3,000 रुपयांची पेन्शन !!! EPFO च्या या योजने बाबत जाणून घ्या
Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा
Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!
Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!