हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुमचे बँक खाते आयडीबीआय बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सरकारकडून खासगी बँक असलेल्या आयडीबीआय बँकेचे सर्व एटीएम 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहतील. बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती दिली आहे. या 12 तासांच्या कालावधीत डेबिट कार्ड तसेच प्रीपेड कार्ड व्यवहार आणि अन्य सेवा देखील उपलब्ध होणार नसल्याचे बँकेने ग्राहकांना सांगितले आहे.
सुविधा कधी बंद होईल
ग्राहकांना पाठवलेल्या एमएमएसमध्ये आयडीबीआय बँकेने म्हटले आहे की सिस्टम अपग्रेडमुळे आयडीबीआय बँकेचे सर्व एटीएम, डेबिट आणि प्रीपेड कार्ड व्यवहार आणि सेवा मंगळवारी सकाळी 10.30 ते बुधवार सकाळी 10 या वेळेत बंद राहतील. या असुविधेसाठी आम्ही दिलगीर आहोत आणि त्यानुसार आपल्या बँकिंग व्यवहाराची योजना बनविण्याची विनंती करतो.
पहिल्या तिमाहीत बँकेने इतका नफा कमावला
आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत आयडीबीआय बँकेचा निव्वळ नफा 144.43 कोटी होता. गेल्या वर्षी एप्रिल ते जून 2019 या तिमाहीत खासगी क्षेत्रातील बँकेचे 3,800.84 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मार्च 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेला 135.39 कोटी रुपयांचा नफा झाला.
गोल्ड लोनवर विशेष ऑफर
आयडीबीआय बँक गोल्ड लोनवर विशेष ऑफर देत आहे. आयडीबीआय बँक सर्वात कमी व्याज दरावर 3 ते 12 महिन्यांसाठी गोल्ड लोन देत आहे. ट्वीटद्वारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे. ट्विटनुसार बँक शेती / व्यवसाय / वैयक्तिक गरजांसाठी त्वरित लोन देत आहे. कोणतेही हिडेन चार्ज आकारले जाणार नाही. तुमच्या सोन्यावर जास्तीत जास्त लोन दिले जाईल. बँक म्हणाली, कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता तुमचे सोने आमच्याकडे सुरक्षित आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.