हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank कडून 21 ऑक्टोबर 2022 म्हणजेच आजपासून “अमृत महोत्सव FD” योजना सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेने 555 दिवसांच्या कालावधीसाठी 6.90% व्याज दरासह स्पेशल FD योजना सुरू केली आहे. यासोबतच बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. यानंतर आता एका वर्षाच्या FD वरील व्याजदर 6.75% झाला आहे. तसेच दोन वर्षांच्या FD वरील व्याजदर आता 6.85% आहे.
यासोबतच बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या “IDBI नमन सीनियर सिटीजन डिपॉझिट” या योजनेचा कालावधी देखील 31 डिसेंबरपर्यंत वाढवला गेला आहे. आता ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी बँकेकडून ऑफर करण्यात आलेल्या 555 दिवसांच्या स्पेशल FD योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, यासाठी 31 डिसेंबर 2022 आधी गुंतवणूक करावी लागेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर
हे लक्षात घ्या कि, 20 एप्रिल 2022 रोजी IDBI Bank ने ज्येष्ठ नागरिकांसाठी “IDBI नमन सीनियर सिटीजन डिपॉझिट” नावाने स्पेशल FD लाँच केली आहे. या योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त ते 10 वर्षांचा असेल. तसेच त्याच्या वैधतेचा कालावधी 20 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत असेल. यासोबतच या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या 0.50% व्याजदरापेक्षा 0.25% अतिरिक्त व्याजदर मिळेल, ज्यामुळे एकूण 0.75% अतिरिक्त व्याज मिळेल. तसेच या दरम्यान नवीन खात्यांवर तसेच रिन्यूअल डिपॉझिट्सवर अतिरिक्त व्याज दर दिले जातील.
IDBI Bank च्या FD वरील नवीन दर
IDBI Bank कडून 21 ऑक्टोबर 2022 रोजी विविध मुदतीच्या ₹2 कोटींपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता बँक 7 ते 30 दिवसांच्या FD वर 3.00%, 31 ते 45 दिवसांच्या FD वर 3.35%, 46 ते 60 दिवसांच्याच्या FD वर 4.00%,61 ते 90 दिवसांच्या FD वर 4.15%, 9 ते 6 महिन्यांच्या FD वर 4.30%, 6 ते 1 महिना ते 270 दिवसांच्या FD वर 5.10% दराने व्याज दिले जाईल.
यासोबतच IDBI Bank 271 दिवस किंवा एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.25%, एक वर्ष ते 2 वर्षाच्या FD वर 6.00%, 2 वर्ष ते 3 वर्षाच्या FD वर 6.10%, 3 वर्ष ते 5 वर्षाच्या FD वर 6.00% व्याजदर देईल. आता आयडीबीआय बँक 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर तसेच 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग FD वर 5.80% व्याज दर देत आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.idbibank.in/interest-rates.aspx
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला 84,000% नफा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, नवीन दर तपासा
Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
Stock Tips : दिवाळीत ‘या’ 5 शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा