९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. त्यामुळे ९ तारखेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली असताना मुंबई महानगरपालिका कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत आहे.

याबद्दल पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे कंगनाच्या हातावरही विमानतळावर उतरल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. येत्या दोन दिवसांत ICMRकडून क्वारंटाईन संदर्भात नवे नियम आल्यास त्यानुसार क्वारंटाईनची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे यावर आता कंगना राणौत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईने केले होते. यावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये मोठा वादही रंगला होता. यापाठोपाठ आता शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कंगनालाही होम क्वारंटाईन केल्यास, काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर अचानक धाड टाकली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यात आली. याठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळल्यास पालिकेकडून तात्काळ पाडकाम केले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment