इथे FD केल्यास मिळते आहे सर्वाधिक ९% व्याज, लवकरच आपले पैसे होतील दुप्पट 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स डिपॉझीटच्या व्याजात सातत्याने घसरण होते आहे. पण अशा काही छोट्या फायनान्स बँक आहेत ज्या ८ ते ९% व्याज देत  आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक या बँकांच्या तुलनेत काही छोट्या फायनान्स बँका जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांचा विचार चांगल्या फायद्यासाठी करू शकता

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे एफडीचे व्याजाचे दर ३ जुलै पासून प्रभावी झाले आहेत. या बँकेत ७ दिवसापासून ९० दिवस आणि ४५ दिवसापासून ९० दिवस एफडीवर क्रमशः ४ आणि ४.५% व्याज मिळेल. १८१ दिवसापासून ३६४ दिवसाच्या एफडीवर ६.५०% व्याज मिळेल. एका वर्षांपसून ६९९ दिवसाच्या परिपक्व झालेल्या एफडीवर ७.७५% व्याज मिळेल. या बँकेत ७०० दिवसात परिपकव होणाऱ्या एफडी वर सर्वाधिक ८%व्याज मिळते आहे. याशिवाय, ७०१ दिवसापासून ३,६५२ दिवसाच्या एफडीवर ७.७५% दराने व्याज मिळते आहे. ज्येष्ठ नागरिकांना या सर्व काळासाठी एफडीवर ५० आधार अंक म्हणजे ०.५०% व्याज मिळेल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीचे दर १ मे २०२० पासून बदलले आहेत. या बँकेत ७ दिवसापासून  ४५ दिवसाच्या एफडीवर ४% आणि ४६ दिवसापासून ९० दिवस एफडीवर ५% व्याज मिळेल. ९१ दिवसापासून ६ महिने एक दिवसापासून ९ महिन्यापर्यंत क्रमशः ५.५% आणि ६.५०% व्याज मिळते आहे. ९ महिने एक दिवसापासून एक वर्ष एक दिवसापर्यंत ७% व्याज मिळते आहे. या बँकेत १ ते २ वर्षासाठी ७.२५% आणि २ वर्षापासून ३वर्षापर्यंतच्या काळासाठी ७.५०% व्याज मिळते आहे. याप्रमाणेच ३ वर्षापसून ५ वर्षापर्यंतच्या कमी काळात परिपक्व होणाऱ्या एफडीवर ७.७५% व्याज मिळते आहे. ५ वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर सर्वाधिक ९% व्याज ही बँक देते आहे. ५ वर्षांपासून १० वर्षापर्यँत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ७.२५% दर मिळतो आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत नवीन व्याज दर १ जून २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. या बँकेत ७ दिवसापासून १० वर्षापर्यंत एफडी करता येते. ७ दिवसापासून ४५ दिवसापर्यंत एफडीवर ४% व्याज मिळेल. ४५ दिवसापासून ९० दिवस आणि ९१ दिवसापासून १८० दिवसाच्या एफडीवर क्रमशः ४.२५% आणि ४.५% दराने व्याज मिळेल. १८१ दिवसापासून ३६४ दिवसाच्या एफडीवर ५.५% आणि ३६५ दिवसापासून ७२९ दिवसासाठीच्या एफडीवर ७.५०% व्याज मिळते आहे. या बँकेत सर्वाधिक व्याज ७३० दिवसापासून १०९५ दिवसाच्या एफडीवर मिळते जे ८% आहे. १०९६ दिवसापासून १८२५ दिवसांसाठी ७% व्याज मिळते. १८२६ दिवसापासून ३६५० दिवसाच्या एफडीवर ६.५०५ व्याज मिळते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.