मोदींनी IFSC केंद्र गुजरातला नेलं तेव्हा फडणवीसांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”२०१४ साली नरेंद्र मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले होते. ३० वर्षानंतर प्रथमच एका माणसाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यांचा करारी बाणा, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मोदींनी अध्यादेश काढला की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार. हा निर्णय गेल्या महिन्यात झालेला नाही. याला काँग्रेसनं विरोध केला. पण, त्यावेळी राज्यात असलेल्या भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही,” असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील स्थितीविषयी भाष्य केलं. त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेल्या IFSC वाद आणि त्याच्या पार्श्वभूमीवरही चव्हाण यांनी प्रकाश टाकला.

मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करून गांधीनगरला महत्त्व द्यायचं हा IFSC केंद्र हलविण्या मागचा विचार होता. त्यामुळे जे काही व्हायचं होतं १ मार्च २०१५ रोजीचं झालं. आपण आज जाग होतोय. चर्चा करतोय, कशा करीता करतोय? पण, गांधीनगर ही योग्य जागा कधीच नव्हती. तिथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुणी येत नाही. मग त्यातून कल्पना पुढे आली की, मुंबईलाच सगळे प्रवासी येतात. मुंबईला सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. मग काय करायचं म्हणून मुंबईहून अहमदाबादला लगेच जाता यावं, म्हणून मग बुलेट ट्रेन करण्याची कल्पना मांडण्यात आली. काहीही करून अहमदाबादला जिवंत करायचं. हाच हेतू त्यामागे आहे,” असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment