मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत (Cabinet meeting) मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक पार पडली. या बैठकीस (Cabinet meeting) यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर, वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम मुंबई) क्लेमेंट बेन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र
राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 8 क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या 12 संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. जायकवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवर्जून निर्देश आजच्या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य #वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री @AUThackeray, खासदार @Vinayakrauts, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार @sjkunte, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. pic.twitter.com/hWAqGDN9Z1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 6, 2022
वनक्षेत्रातील रस्ते विकासांच्या कामांना मान्यता
वनक्षेत्रातील रस्ते विकासांच्या कामांना मान्यता देताना वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांची काळजी घेण्यात यावी. विशेषतः संवेदनशील तसेच व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी, अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकास कामांबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात यावी, प्रकल्प, विकास कामांच्या प्रस्तावांबाबत निर्णय घेताना स्वयंसेवी संघटना, तज्ज्ञ आदींना सहभागी करून घेण्यात यावे. त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून निर्णय घ्यावे असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले आहे.
राज्यात ६९२.७४ चौ.किमी.चे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनर्वसन व मोबदला याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. pic.twitter.com/dBiU3slwO8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 6, 2022
दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर तोडगा
यावेळी बैठकीत (Cabinet meeting) सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्गमधील वन्यहत्ती समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील 12 संवर्धन राखीव क्षेत्र
आज घोषित करण्यात आलेल्या 12 संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (66.04 चौ.कि.मी), अलालदारी (100.56 चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (84.12 चौ.कि.मी), मुरगड (42.87 चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी), इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (47.62 चौ.कि.मी), रोहा (27.30 चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (28.44 चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (1.07 चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (5.34 चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (103.92 चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.
राज्यात नवीन 3 अभयारण्य क्षेत्राची घोषणा
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मान्य करण्यात आला.
राज्यात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित
राज्यात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे (5.145 चौ.किमी.), बोर (61.64), नवीर बोर (60.69), विस्तारित बोर (16.31), नरनाळा (12.35), लोणार वन्यजीव अभयारण्य (3.65), गुगामल राष्ट्रीय उद्यान (361.28 चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (22.37), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (29.90), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (2.17) यांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान