हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली जात आहे. याप्रश्नी राष्ट्रवादीच्या बाध्य नेत्यांची सिल्व्हर ओकवर मिटिंग सुरु असून त्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिका निकाली काढत 15 दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत म्हंटल आहे कि, देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार हे मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्यांनी नैतिकता पाळणं हे संकेत आहेत. आतापर्यंत राजीनामाची मागणी केली असता कोर्टाने कुठे आदेश दिला असा सवाल केला जात होता. आता कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पवारांकडे आहेत. तेच या विषयावर निर्णय घेतील. पवार साहेब आजारी आहेत, आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही, असं ते म्हणाले.