हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत शिवसेना आघाडी करणार नाही,” असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगावे. तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे,” असा टोला जलील यांनी लगावला.
संजय राऊत यांनी एमआयएमच्या युतीच्या प्रस्तावाबाबत नकार दर्शविल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील याणी राऊत यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी इम्तियाज म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतायत कि एमआयएमशी युती नको. मी त्यांना आव्हान करतो कि तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा. भाजप विरोधात स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असे जलील यांनी यावेळी म्हंटले.
संजय राऊत आमची पार्टी तुमच्यासारखी नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर करता. तुमच्यापेक्षा आम्ही त्यांचा जास्त आदर करतो, असेही यावेळी जलील यांनी म्हंटले.