हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ या ठिकाणी एका रुग्णालयातील भयानक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाला विवस्त्र करुन बेल्ट-स्टिकने मारहाण (beaten) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक महिला दोन पुरुष असे मिळून रुग्णालयात त्या तरुणाला मारहाण (beaten) करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लखनऊमधील निजी रुग्णालयातील आहे.
काय घडले नेमके?
पीडित तरुणाने हॉस्पीटलचं बील भरण्यास नकार दिल्यामुळे महिलेने त्याला मारहाण केली आहे. विशेष म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या रुग्णांच्या समोर त्याला मारहाण (beaten) करण्यात आली. ज्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला तरुणाला मारत आहे. त्यावेळी तो त्यांना विनंती करीत आहे, की मला मारु नका. परंतु दोन पुरुषांच्या मदतीने महिलेने त्या रुग्णाची चांगलीच धुलाई केली आहे.
रुग्णालयात महिलेची तरुणाला बेल्ट-स्टिकने मारहाण, Video आला समोर pic.twitter.com/tSMYMRFLiJ
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 26, 2022
पीडित तरुणाच्या पोटाचं ऑपरेशन करण्यातं आलं होते. ज्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याची वेळी आली, त्यावेळी त्याला झालेलं बील सांगण्यात आलं. परंतु त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे त्याला हि मारहाण (beaten) करण्यात आली. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…