कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातल्या (Kolhapur) आसुर्ले पोर्लेमधील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या गोदामात हि दुर्दैवी घटना घडली आहे. शेरेबंग नारझाया असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेत अजून एक मजूर जखमी झाला आहे. बिस्टू बसूमातारी असे या गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. जखमी कामगारावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखर गोदामातील पोती ट्रकमध्ये भरत असताना हि दुर्दैवी घटना घडली आहे.

नेमके काय घडले?
शनिवारी दुपारी साखरेची विक्री आणि बाहेरील गोदामात पोती स्थलांतरीत करण्याचे काम सुरु होते. यावेळी मजुर पोती गोदामात भरण्याचे काम करत होते. यादरम्यान शेरेबंग नारझाया या मजुराच्या अंगावर थप्पीतील काही पोती पडली. यावेळी पोत्याखाली सापडलेल्या मजुराला वाचवण्याचा प्रयत्न इतर मजुर करीत होते.मात्र त्याचदरम्यान 60 फूट उंच पोत्यांची थप्पी पुन्हा कोसळली.

यावेळी शेरेबंग हा या पोत्यांखाली पूर्णपणे गाडला गेला. पोती पडताना जीव वाचवण्याच्या प्रतयत्नात दुसरा मजुर बिस्टू बसूमातारीचे डोके बेल्टच्या पट्ट्यावर धडकले आणि तो गंभीर जखमी झाला. या दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शेरेबांग याचा मृत्यू झाला असून बिस्टू बसूमातारीवर अजून उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा 
Gold Price : सोने महागले तर चांदी घसरली

आता तुम्ही कोणाची औलाद आहात ते सांगावे; अजित दादांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच…

वाघाची डरकाळी अन् भगवा झेंडा….; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर पहाच…..

“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला

Leave a Comment