मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेतुन बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरूर मतदार संघातून लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार आहेत. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उभे असणार आहेत.
शिरूर लोकसभेत आम्हीच जिंकणार असा विश्वास असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले. गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादीला शिरूरसाठी एकही उमेदवार भेटला नाही, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना मराठा म्हणून नाही तर माळी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याचे ते म्हणाले.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर विभागातून तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. शिरूर येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा
सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश ?
‘या’ जागेवरून पवार – विखे पाटील यांच्यात वाद