जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा राहिले आहेत.
गिरीश महाजन यांनी घेतलेली सेल्फीचं मीडियाच्या मनात भरली आहे. परंतु त्यांनी रात्रीचा दिवस करून पूरग्रस्तांना केलेली मदत मात्र मीडियाच्या नजरेत भरली नाही. त्यांनी पूरग्रस्तांसाठी केलेले काम कौतुकास पात्र आहे. प्रसंगी गिरीश महाजन यांनी पाण्यात उतरून येथील लोकांना वाचवण्याचे काम केले त्यावर कोणी बोलायला तयार नाही असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
माझ्या बाबतीत जे झाले तेच गिरीश महाजन यांच्या बाबतीत झाले आहे असे मला वाटते. माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी मी लोकांसाठी केलेले चांगले काम मीडियाला दिसले नाही. माझे दाऊदच्या बायकोशी कसे संबंध आहेत हे मीडियाला दिसले. त्यामुळे बातम्या देण्यात आततायी पणा नदाखवता ठोस बातमी देऊन मीडियाने आपली विश्वसनीयता वाढवावी असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.