हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, कोरोनाकाळात मागणी केलेला निधी, औषधांचा अपुरा पडलेला पुरवठा यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. कोरोनाच्या या महामारीत वैद्यकीय शिक्षण अथवा आरोग्य विभागात पदे, निधीची कमतरता पडणार नाही. उंची तीन हजार सहाशे पत्र पाठवून पदे भरण्याबाबत व निधीबाबत संपूर्ण करणारी पत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाला पाठवली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा बाप से बेटा अधाई अशी कृती केली असल्याचे म्हणत मुनगंटीवार टीका केली.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाला आठवण करून देण्यासाठी स्मरण पत्रे पाटवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ मार्चपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाची पदे भरू असे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र, आज तुमच्या विभागात यमराजाची एजंट म्हणून काम करणारे जे लोक आहेत. मृत्यू होत आहेत. रुग्णांना औषधे दिले जात नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही अधिवेशनात एक उत्तर देता. आणि दुसरीकडे तुमच्याच विभागाकडून असे उत्तर दिले जात आहेत.
8 कोटी 21 लाख 44 हजारांचे रुपये या अनुदानाची मागणी केली मात्र ते प्राप्त झाले नसल्याने औषधे खरेदी केली नाहीत, असे स्पष्टीकरण विभागाच्यावतीने लेखी दिले आहे. आम्हाला अशी खात्री होती कि बाप से बेटा सवाई असेल मात्र उपमुख्यमंत्री पवारांची कृती हि बाप से बेटा अधाई अशी आहे. सवाई का झाली नाही. त्यामुळे आता कोरोनाच्या या महामारीत रुग्णांना लवकरात लवकर उपचार व औषधांचा पुरवठा करून देणार आहा का? कि त्यांना अफक्त साधी गोळी देणार अहा हे स्पष्ट करावे? असा सवाल यावेळी मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.