१ जून पासून बदलणार इनकम टॅक्सशी निगडित ‘हा’ फॉर्म; काय होणार परिणाम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नवीन दुरुस्तीसह फॉर्म २६ एएसला अधिसूचित केले आहे. हे आपले वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे. आपल्या पॅन नंबरच्या मदतीने आपण आयकर विभागाच्या वेबसाइटवरून हे काढू शकता. जर आपण आपल्या उत्पन्नावर कर भरला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीने / संस्थेने आपल्या उत्पन्नावरील कर वजा केला असेल तर फॉर्म २६ एएस मध्ये आपल्याला त्याचा उल्लेख देखील मिळेल. हा नवीन फॉर्म १ जून २०२० पासून लागू होईल.

फॉर्म २६ एएस बद्दल जाणून घ्या.

फॉर्म २६ एएस मध्ये फक्त आपण भरलेल्या कराचीच माहिती नाही, तर आपण जर अधिक कर भरला असेल आणि आपल्याला रिफंड फाइल करायचा असेल तर त्यामध्ये त्याचाही उल्लेख आहे. जर एखाद्या वित्तीय वर्षात आपल्याला प्राप्तिकर रिफंड मिळाला असेल तर त्याचे विवरण देखील त्यामध्ये आहे. एक कर्मचारी म्हणून, आपल्याला वेळोवेळी ट्रॅक्सच्या वेबसाइटवर फॉर्म २६ एएस तपासणे आवश्यक आहे. जर आपला पॅन क्रमांक आपल्या TDS शी जोडलेला असेल तर आपण या वेबसाइटवर आपले टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट पाहू शकता. ट्रेसच्या वेबसाइटवर ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे.

आता काय बदलले आहे – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सुधारित फॉर्म २६ एएसला अधिसूचित केले. आता मालमत्ता आणि शेअर व्यवहारांची माहिती देखील या फॉर्ममध्ये समाविष्ट केली गेली आहे. यासह फॉर्म २६ एएसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये आता टीडीएस-टीसीएसच्या तपशिलाशिवाय काही आर्थिक व्यवहार, कर भरणे, वित्तीय वर्षात करदात्याने डिमांड-रिफंडशी संबंधित प्रलंबित किंवा पूर्ण प्रक्रिया समाविष्ट केली गेली आहे.

याचा तपशील प्राप्राप्तिकर रिफंडमध्ये द्यावा लागेल. त्याच्या अंमलबजावणीसाठी, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात नवीन कलम २८५ बीबीचा प्राप्तिकर कायद्यात समावेश करण्यात आला. सीबीडीटीने सांगितले की सुधारित २६ एएस फॉर्म हा १ जूनपासून लागू होणार आहे.

आपण प्राप्तिकर वेबसाइटवर फॉर्म २६ एएस डाउनलोड करू शकता-

तज्ञ म्हणतात की इनकम टॅक्स रिटर्नची (आयटीआर) प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म २६ एएस, फॉर्म १६ आणि फॉर्म १६ ए काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. जर सर्व काही ठीक असेल तरच तुम्ही तुमचे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करा.

आपण ट्रेसच्या वेबसाइटवरून फॉर्म २६एएस डाउनलोड करू शकता. फॉर्म २६ एएस ला डाउनलोड करण्यासाठी आपण इनकम टॅक्स फाइलिंग वेबसाइटवर लॉग इन करा.

माय अकाउंट सेक्शन, आपण व्यू फॉर्म २६ एएस (टॅक्स क्रेडिट) टॅबवर क्लिक करा. यानंतर आपण ट्रेसच्या (TRACES)वेबसाइटवर पोहोचू शकता.

येथे आपण एसेसमेंट इयर टाकल्यानंतर स्टेटमेंट डाउनलोड करू शकता. आपली जन्मतारीख फॉर्म २६ एएस उघडण्यासाठी पासवर्ड म्हणून वापरला जाईल.

प्राप्तिकर भरण्याची शेवटची तारीख- नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न फाईल केले आहे त्यांना मोठा दिलासा दिला असून, २०१९-२० साठी इनकम टॅक्स रिटर्नची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० पासून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवल्याची घोषणा केली. सध्या ३१ जुलै २०२० ही एसेसमेंट इयर २०२०-२१ साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.