… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ सेल साठी चीनवर विसंबून राहण्याचे कारण हे आहे की त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात परवडणारा दुसरा पर्याय नाही. देशात सध्या डिजिटल पेमेंटची मागणी वाढतच आहे आणि मॉल्स आणि रिटेल स्टोअरमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड (डेबिट-क्रेडिट कार्ड ट्रांझॅक्शन) च्या व्यवहारांसाठी या स्वाइप मशीनची भूमिका वाढली आहे.

चीनकडून आयात कमी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, त्यानंतर पेमेंट्स प्रोवाइडर चीनमध्ये बनविलेल्या पीओएस साठी पर्याय शोधत आहेत. मात्र इंडस्ट्रीतील सूत्रांनी ईटीला सांगितले की, किंमती आणि कायदेशीर आव्हानांमुळे त्वरित एखादा पर्याय स्वीकारणे कठीण होईल.

चीनमध्येच केली जाते पीओएस मशीन्सची निर्मिती, म्हणून तिथे स्वस्त आहे
ईटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार काही कंपन्यांचे चीनमध्ये उत्पादन युनिट्स आहेत. तैवान आणि दक्षिण कोरियामध्येही त्यांची काही युनिट्स आहेत. तैवान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम हे या मशीन्सची निर्यात करतात पण त्यांची किंमत ही चीनच्या तुलनेत कमीतकमी 20 ते 30 टक्के जास्त आहे. याचे कारण म्हणजे या देशांमध्ये उत्पादन कमी आहे.

आता खेड्यांमध्ये व शहरांमध्ये पीओएस मशीन्स आवश्यक झाली आहे
देशात डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत पीओएसचा वापर गावोगावी तसेच शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ग्रामीण भागातील पीओएसला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने मे महिन्यात 250 कोटींची तरतूद केली होती. यामध्ये विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांचा वाढता वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या देशातील पीओएसपैकी 95 टक्क्यांहून अधिक मशीन्स या चीनमधून आयात केल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.