नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब रहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला आहे, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा खरमरीत सवाल राहुल गांधी यांनी विचारत मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
राहुल गांधी यांनी कालही एक व्हिडिओ ट्विट केला. ‘देशातील शूर शहीदांना माझा सलाम’ राहुल यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअऱ केला आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. चीनने आमची जमीन हडप केली. पंतप्रधान तुम्ही गप्प का आहात? तू कुठे लपवत आहेस? बाहेर या. संपूर्ण देश, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”