टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Team India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीज सुरु होण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. पण त्या अगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजपासूनच शुभमन गिलच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येदेखील गिल अपयशी ठरला होता.

शुभमन गिल 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे. पण शुभमन गिलला नेमकी कोणती दुखापत झाली आहे याबाबत अजून टीम प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. शुभमन गिलला हॅमस्ट्रिंग किंवा पोटरीला दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिल टीममधून बाहेर झाला असला तरी तो मायदेशी न परतता इंग्लंडमध्ये टीमसोबतच राहणार आहे. टेस्ट सीरिजदरम्यान तो पुन्हा फिट होईल, अशी अपेक्षा टीम प्रशासनाला आहे.

नासीर हुसेनची टीका
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने शुभमन गिलवर जोरदार टीका केली आहे. फायनलमध्ये अपयशी झाल्यामुळे त्याला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळणे कठीण आहे. त्याच्याऐवजी मयंक अग्रवाल किंवा केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते असे नासीर हुसेन म्हणाला होता.

खेळाडूंची विश्रांती
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू 20 दिवसांच्या सुट्टीवर आहेत. हे खेळाडू 14 जुलैला पुन्हा एकत्र येणार आहेत. यानंतर इंट्रा स्क्वॅड मॅच खेळवण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातली 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारताचा 4-1 ने पराभव झाला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी विराट कोहलीची टीम तयार असणार आहे.