व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या डावपेचांना महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही : नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. बुधवारी दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपमधील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत टीकास्त्र सोडले आहे. आम्ही बोलू तोच कायदा, बोलू तेच होणार असे म्हणणाऱ्या भाजपने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. हि थट्टा होऊ देणार नाही. आणि भाजपच्या डावपेचांनाही महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष घाबरत नाही, अशा शब्दात मलिकांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका करीत रणनीती आखली असल्याचे म्हंटले आहे. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनीही भाजपला पप्रतिउत्तर दिले असून त्यांनी जोरदार टीका केली आहे. मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घरत भाजपपर हल्लाबोल केला. भाजपकडून देशभरातील लोकांवर राजकीय दबाव आणला जात आहे. बंगाल मॉडेलबाबत मलिक म्हणाले कि, भाजपच महाराष्ट्र राज्यात बंगाल मॉडेल राबवायची खूप इच्छा आहे. त्यांनी हे मॉडेल राज्यात नक्की राबवावे मात्र, त्यांच्या या मॉडेलमधील डावपेचांना महाविकास आघाडी सरकारमधील एकही पक्ष घाबरणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं.

मलिक यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विश्वास व्यक्त केला. या निवडीत काँग्रेसचाच अध्यक्ष होईल. फक्त आमदारांचेकोरोनाचे रिपारतं येणे बाकी आहे. त्यानंतर या अध्यक्षपदासाठी जो काही अंतिम निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असेल. महाराष्ट्राच्या दृष्टीने विधानसभा आध्यक्षपदाची निवड करणे हे महत्त्वाचेच आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत आहे. असेही मलिक यांनी म्हंटले आहे.