हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank: RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indian Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
29 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू
29 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. बँकेने 1 वर्ष ते 5 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 90 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवले. या बदलानंतर, इंडियन बँक आता 7 दिवस ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 2.80% ते 6.30% व्याजदर देत आहे. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर आता इंडियन बँकेत जास्तीत जास्त 6.50% व्याजदर मिळेल.
Indian Bank नवीन व्याज दर
7 ते 14 दिवस – 2.80 टक्के
15 ते 29 दिवस – 2.80 टक्के
30 ते 45 दिवस – 3.00 टक्के
46 ते 90 दिवस – 3.25 टक्के
91 ते 120 दिवस – 3.50 टक्के
121 ते 180 दिवस – 3.85 टक्के
181 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 4.50 टक्के
9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.75 टक्के
1 वर्ष – 6.10 टक्के
1 वर्षापेक्षा जास्त 2 वर्षांपेक्षा कमी – 6.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 6.50 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.40 टक्के
5 वर्षे – 6.40 टक्के
5 वर्षांपेक्षा जास्त – 6.30 टक्के
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Indian Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.indianbank.in/departments/deposit-rates/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा