Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर

Indian Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank कडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली​​ आहे. ज्यानंतर आता बँकेच्या होम आणि ऑटो लोनवरील व्याजदरातही वाढ झाली आहे. यानंतर आता EMI वाढणार असून यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार देखील वाढणार आहे.

Indian Bank ने याविषयी माहिती देताना सांगितले की, मार्जिनल कॉस्‍ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 0.10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरासाठी ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता जास्त कालावधीची कर्जे महागतील. बँकेकडून ट्रेझरी बिलांवर आधारित बेंचमार्क देखील बदलण्यात आला आहे. Indian Bank ने सांगितले की, एसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटीने पुनरावलोकनानंतर निर्णय घेतला की, MCLR आणि TBLR वाढवणे आवश्यक आहे. 3 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू होतील.

Indian Bank in search of new BPM and middleware systems - FinTech Futures

असे असतील नवीन दर

या दरवाढीनंतर आता नवीन MCLR 7.75 टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत बँकेकडून एका वर्षाच्या MCLR वर 7.65 टक्के व्याज आकारला जात होता. यावेळी बँकेने सांगितले की,” बँकेकडून होम, ऑटो आणि पर्सनल लोनवरील व्याजदर ठरवण्यासाठी फक्त एक वर्षाचा MCLR वापरला जातो. म्हणजेच या व्याजदरांमध्ये काही बदल झाल्यास याचा परिणाम EMI वर देखील होईल.

Indian Bank profit jumps 34% to Rs 690 crore in December quarter | Business Standard News

इतर कालावधीसाठीचे व्याजदर देखील वाढले

Indian Bank ने सांगतले की, एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR देखील वाढवण्यात आला आहे. आता ओव्हरनाईट MCLR ते 6 महिन्यांपर्यंतच्या MCLR चे व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतर आता नवीन दर 6.95 टक्क्यांवरून 7.60 टक्क्यांवर पोहोचले आहेत. याशिवाय, बँकेने ट्रेझरी बिल बेंचमार्क लेंडिंग रेट (TBLR) मध्ये देखील वाढ केली आहे,त्याचे दर 5.55 टक्के ते 6.20 टक्के पर्यंत पोहोचले आहेत.

Under Project WAVE, Indian Bank has launched a pre-approved personal loan

बँकांची कर्जे का महागली ???

Indian Bank आधी सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बॅंकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ केली ​​आहे. ज्यामुळे होम, ऑटो सहित सर्व कर्जे महागली आहेत. गेल्या काही दिवसां पासून RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ झाली आहे ज्यामुळे बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात करण्यास सुरुवात केली.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/lending-rates/

हे पण वाचा :

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये चांगल्या नफ्यासह मिळवा कर सवलतीचा लाभ !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव पहा

Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!