हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय नौदलाकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता स्पेशल फॉर्सेसमध्ये महिलांना कमांडो (MARCOS) बनण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांची प्रतिक्रिया
भूदल, नौदल आणि हवाई दलात काही सैनिकांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जाते. जेणेकरुन स्पेशल मिशनवर जाण्यास सक्षम असतील. या मिशनसाठी तयार करणाऱ्या सैनिकांना खडतर प्रशिक्षण दिलं जाते. या प्रशिक्षणानंतर जर महिला अधिकारी नौदलाच्या परीक्षेत खऱ्या उतरल्यातर नौदलात त्यांची मार्कोस (MARCOS) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय लष्करासाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
नौदलातील महिला आता मरीन कमांडो म्हणजे मार्कोस (MARCOS) बनू शकणार आहेत. यासाठी त्यांना काही निकष पूर्ण करावे लागणार आहेत. भारतीय लष्कराच्या इतिहासातील हा गौरवशाली क्षण आहे. परंतु स्पेशल फोर्सेसच्या तुकडीकडे थेट कोणालाही सहभागी होता येत नाही. त्यासाठी महिला कमांडोना स्वयंसेवक म्हणून काम करावं लागणार आहे. पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोसच्या (MARCOS) प्रशिक्षणाची परवानगी देण्यात येणार आहे.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…