पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे उद्ध्वस्थ करायला भारतीय वायुसेना २४ तास तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुसेनेचे (एएएफ) प्रमुख एअर चीफ मार्शल (एसीएम) आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी पाकिस्तानला चेतावणी दिली. ते म्हणाले की,’ भारतीय हवाई दल एलओसी ओलांडून दहशतवादी छावण्या आणि लॉन्चपॅडस संपवण्यासाठी २४ तास तयार आहे. चीनच्या हवाई उल्लंघनाच्या प्रश्नावर ते म्हणाले की,’ अशा प्रकारच्या मुद्द्यांबाबत ‘कोणतीही चिंता’ नसावी.

न्यूज एजन्सी एएनआयने भारतीय वायु सेना प्रमुख भदौरिया यांना पाकिस्तानी वायुसेनेबद्दल विचारले असता ते म्हणाले,’ हंदवाड़ा चकमकीनंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानने भयभीत होऊन गस्त वाढवली असून आता पाकिस्तान चिंतेत आहे. त्याला उत्तर म्हणून हवाई दलाचे प्रमुख भदोरिया म्हणाले, ‘जेव्हा कधी आपल्या भूमीवर दहशतवादी हल्ला होईल तेव्हा त्यांनी त्याची चिंता करायला हवी आणि ते चिंतीत झाले होते. जर त्यांना या चिंतेमधून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी भारताविरोधी सुरु असलेला दहशतवाद थांबवावा.’

हंदवाडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून सूड उगवण्याची भीती आहे का ? असे विचारले असता हवाई दलाचे प्रमुख भदौरिया यांनी न्यूज एजन्सी एएनआयशी संवाद साधताना हे सांगितले.

 

अलीकडेच लडाखमध्ये चीनने हवाई सीमेचे उल्लंघन करण्याच्या प्रश्नावर भदोरिया म्हणाले, “तिथे असामान्य उपक्रम होते. आम्ही अशा घटनांवर लक्ष ठेवतो आणि आवश्यक ती कारवाई करतो. अशा घटनांमध्ये जास्त काळजी करण्याची गरज नाही.” “

 

 

अलीकडेच ९ मे रोजी उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. त्याच वेळी लडाखमधील एलएसी जवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स दिसली. यानंतर भारतीय हवाई दलानेही लढाऊ विमानांच्या साहाय्याने तेथे गस्त घालण्यास सुरवात केली.

२ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ सैनिक शहीद झाले. या चकमकी दरम्यान सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यापैकी एक हैदर होता, जो लष्कर-ए-तैयबाचा एक सर्वोच्च दहशतवादी होता. यानंतर, ४ मे रोजी सीआरपीएफच्या गस्त घालत असलेल्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणखी ३ सैनिक शहीद झाले तर या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment