इंडियन ऑईलने सुरू केली खास ऑफर, इतक्या रुपयांचे फ्युल जिंका एसयूव्ही कार आणि बाइक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंडियन ऑईलने आपल्या रिटेल कस्टमरसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये आपण इंडियन ऑईलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्समधून फ्यूल भरून अनेक बक्षिसे मिळवू शकता. आपण इंडियन ऑईलच्या या ऑफरचे नाव ‘भरा फ्युल जिंका कार’ असे आहे. ज्यामध्ये फक्त आपल्याला 400 रुपयांचे तेल भरावे लागतील. त्यानंतर आपण या ऑफरचा भाग बनून एसयूवी कार पासून ते बाइक्सही जिंकू शकता. इंडियन ऑईलनुसार ही ऑफर 4 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. जे की 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत व्हॅलिड असेल. ही ऑफर एक्स्ट्रापीमियम आणि एक्स्ट्रामाइल ऑइल साठी देखील लागू असेल.

या ऑफर मध्ये पार्टिसिपेट कसे करावे हे जाणून घ्या
इंडियन ऑईलनुसार या ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला 400 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल भरावे लागेल. त्यानंतर एक सिंगल प्रिंटटेड बिल मिळेल. ज्यामध्ये बिल नंबर आणि डिलर कोड अंकित असेल. यासाठी आपल्याला एसएमएस द्वारे डिलर कोड <स्पेस> बिल नंबर <स्पेस) बिल रक्कम ’लिहून 90521 55555 वर पाठवावा लागेल. ही ऑफर एक्स्ट्रापीमियम आणि एक्स्ट्रामाइल ऑइल साठी देखील लागू असेल.

एका दिवसात आपण एकच एसएमएस करू शकता
इंडियन ऑईलनुसार आपण एका दिवसात एक आउटलेट्सचे एकच बिल आणि डिलर नंबर एसएमएस च्या करू शकता. जर आपल्याला एका दिवसात दोनदा या ऑफरचा लाभ घ्यायांचा असेल तर आपल्याला दुसऱ्या आउट्लेट मधून पेट्रोल किंवा डिझेल भरावे लागेल.

https://t.co/YVmTT8PZko?amp=1

लकी ड्रॉ विनरला मिळणाऱ्या बक्षिसांची लिस्ट
इंडियन ऑईलच्या या ऑफरमध्ये जी लोकं सहभागी होतील त्यांपैकी विजेत्याची निवड लकी ड्रॉ विनर द्वारे केली जाईल. या ऑफरच्या अंतर्गत या वस्तू दिल्या जातील.

> एक एसयूवी (मेगा लकी ड्रॉ)
> चार कार (मेगा लकी ड्रॉ)
> 16 बाईक्स (मेगा लकी ड्रॉ)
> दर आठवड्याला 25 विजेत्यांना मिळेल 5 हजार रुपयांचे तेल
> दररोज 100 एक्स एक्स्ट्रारिवार्ड्स मेंबर्स (ज्यांनी एक्स्टारिव्हार्ड्स प्रोग्राममध्येही भाग घेतला आहे) विजेत्यांना मिळतील 100 रुपयांचे फ्री तेल

https://t.co/8msbBVlYag?amp=1

बिल हरवल्यावर नाही मिळणार बक्षीसे
इंडियन ऑईलने आपल्या वेबसाइटवर याबाबत स्पष्टपणे माहिती दिली आहे, परंतु जर कोणाचेही बिल हरवले असेल किंवा ई-रिसीट डिलीट झाले असेल तर त्यांना बक्षिसे मिळणार नाहीत. त्यामुळे ओरिजिनल प्रिंटेड बिल सांभाळून ठेवणे जरुरीचे आहे. तथापि इंडियन ऑईलने झेरॉक्स काढून ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे, जेणेकरून ओरिझिनल बिलची शाई पुसली गेली तर झेरॉक्सद्वारे ते व्हेरिफाय केले जाऊ शकते. त्याशिवाय विजेत्यांची संपूर्ण लिस्ट इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर दिली जाईल. याव्यतिरिक्त या योजनेविषयीची अधिक माहिती इंडियन ऑईल वेबसाइटवर उपलब्ध आहे.

https://t.co/trzvRusgxQ?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.