हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट (Union Budget 2024) सादर करत अनेक घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी रेल्वे विभागासाठी (Indian Railways) सुद्धा विशेष आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे सांगितलं. देशातील पर्यटनाला चालना देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वे आणि विमान सुविधा अधिक चांगल्या कशा करता येतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून भारतातील 40 हजार नॉर्मल रेल्वे कोचचे रूपांतर वंदे भारत ट्रेनच्या कोचमध्ये करणार असल्याचे सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं.
रेल्वे विभागासाठी नेमक्या काय घोषणा – Indian Railways
रेल्वेचा प्रवासाचा (Indian Railways) अनुभव हा आधुनिक, कार्यक्षम आणि आरामदायी असावा यादृष्टीने सरकारने हे पाऊल उचललं आहे. हा उपक्रम सरकारच्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा एक भाग आहे, केंद्र सरकार तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करणार आहे. यामध्ये ऊर्जा, खनिज, सिमेंट कॉरिडॉर, हाय ट्रॅफिक कॉरिडोर, आणि बंदराना जोडणारे कॉरिडोर यांचा समावेश आहे. याशिवाय मेट्रो आणि नमो भारत सेवा मोठ्या शहरांमध्ये विस्तारित करण्याची सरकारची योजना आहे. देशाच्या विकासासाठी भारतीय रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. यामुळे रेल्वेच्या सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जात आहेत. (Budget For Indian Railways)
हे पण वाचा- दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत; मोदी सरकारची घोषणा
निर्मला सीतारामण यांनी आपल्या भाषणात विमान वाहतुकीवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत विमान वाहतूक क्षेत्राला चालना दिली आहे. गेल्या दशकात विमानतळांची संख्या दुप्पट होऊन 149 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारने जेट इंधन किंवा एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती 1,221 रुपये प्रति किलोलीटरने कमी करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.