भारतीयांना चिनी वस्तु वापरण्याशिवाय पर्याय नाही, बहिष्कर तर दूरच – चीन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यापासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही कडे सीमेवर सैन्य वाढविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  हा वाद शांततेने मिटविला जावा यासाठी प्रयत्न केले जावेत अशी चर्चा शनिवारी झालेल्या बैठकीत झाली होती. मात्र चिनी माध्यमे भारतावर निशाणा साधून असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील दैनिक ग्लोबल टाइम्स ने एका लेखातून चीनच्या वस्तूंशिवाय भारताला पर्याय नसल्याचे छापले आहे. काही भारतीयांमुळे भारतात चीन च्या विरोधी भावना निर्माण झाल्याचे त्यांनी लिहिले आहे.

“सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकविण्याचे काम काही भारतीय करीत आहेत. तसेच ते चीनला कलंकित करू पाहत आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे. चीनची उत्पादने ही सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. आणि त्यांना त्यांच्या जीवनात पुनर्स्थित करणे अवघड आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णतः अपयशी ठरेल.” असे या ग्लोबल टाइम्स ने लिहिले आहे. सध्या भारतात चिनी वस्तुंना न वापरण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविली जात आहे.

 

यापूर्वी ग्लोबल टाइम्सने “भारतात रणनीती तयार करण्याचं आणि धोरणं ठरवण्याचा अधिकार एका छोट्या समुहाकडे आहे. तो समूह चीनविरोधातील नकारात्मक विचारांनी भरलेला आहे. चीनची प्रगती तसंच बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढती दरी यामुळे चीनविषयीचा भारताचा संभ्रम वाढत आहे,” असे ट्विट केले होते. ग्लोबल टाइम्सने या लेखात सोनम वांगचुक यांचाही उल्लेख केला आहे. सोनम वांगचुक यांनी युट्युबवर व्हिडीओ करून चिनी वस्तू देशाने बहिष्कार घालण्याआधी तुम्हीच वापरणे बंद करा असे सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment