हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Exemption : परदेशात जाऊन नोकरी करायचे स्वप्न अनेक लोकं पाहतात. मात्र जेव्हा आपण नोकरी निमित्ताने इतर देशांमध्ये जातो तेव्हा आपल्याला भारताप्रमाणेच या देशांमध्येही टॅक्स भरावा लागतो. अशाच अनेक देशांपैकी दुबई हे देखील एक आहे. जिथे जाऊन राहणे आणि काम करणे अनेक भारतीयांना आवडते. यामागील मुख्य कारण असे कि, दुबईमध्ये पेमेंट हे दिरहममध्ये केले जाते, जे भारतीय चलनापेक्षा खूप जास्त आहे. मात्र असे असले तरीही तिथे त्याच प्रमाणात टॅक्स देखील भरावा लागतो. आता इथे काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण संयुक्त अरब अमिराती (UAE) ने एक नवीन टॅक्स सिस्टीम लागू केली, ज्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर टॅक्स सूट जाहीर करण्यात आली आहे.
UAE ने टॅक्सबाबत जारी केलेल्या फेडरल डिक्रीमध्ये असे सांगितले की, आता छोट्या व्यवसायिकांना टॅक्समध्ये मोठी सूट दिली जाईल. 1 जून 2023 पासून टॅक्सचा नवीन नियम लागू होईल. याचा फायदा UAE मधील नागरिकांनाबरोबरच तेथे कमाईसाठी गेलेल्या भारतीयांनाही मिळणार आहे. या टॅक्सच्या नवीन नियमांनुसार आता कर सवलतीची मर्यादा 84 लाख रुपये करण्यात आली आहे. Income Tax Exemption
कोणाकोणाला लागू होईल ???
UAE ची ही नवीन टॅक्स सिस्टीम फक्त तिथल्या व्यवसायातून कमाई करणाऱ्यांनाच लागू होईल. मात्र पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नवीन टॅक्स सिस्टीम लागू होणार नाही. तसेच दुबईत आधीपासून नोकरी करत असलेल्या लोकांना आणि नोकरीच्या शोधात तिकडे जाणारे लोकांनाही हा नियम लागू होईल. ता टॅक्सच्या नवीन नियमानुसार, आता व्यवसायातून 3.75 लाख दिरहम पर्यंतचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच सुमारे 84 लाख रुपये टॅक्सच्या कक्षेबाहेर असतील. Income Tax Exemption
भारतीय नागरिकांनो लक्ष द्या
UAE च्या नवीन टॅक्सच्या कायद्या अंतर्गत, कॉर्पोरेट टॅक्स डिस्काउंट फक्त त्याच व्यवसायांना लागू होईल जे क्वालिफाइंग फ्री झोनमध्ये येतील. त्यामुळे येथे जाणार्या भारतीय नागरिकांनी सर्वात आधी त्यांनी केलेला व्यवसाय या कक्षेत येणार की नाही याची संपूर्ण माहिती घ्यावी. कारण या अटी पूर्ण करणाऱ्या व्यवसायांनाच टॅक्समध्ये सूट दिली जाईल. Income Tax Exemption
…तर भारतीय कंपनीला UAE चे नागरिकत्व मिळेल
या नवीन टॅक्स सिस्टीम म्हटले की, जर एखाद्या भारतीय कंपनीवर संपूर्णपणे UAE चे नियंत्रण असेल तर ती तिथली नागरिक समजली जाईल. मात्र, याबाबतचा नियम अतिशय काळजीपूर्वक माहिती करून घ्यावा लागेल, कारण यामुळे कदाचित दुप्पट टॅक्स द्यावा लागू शकतो. त्यामुळे अशा व्यवसायाला UAE आणि भारताचे कर कायदा बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. Income Tax Exemption
नवीन कॉर्पोरेट टॅक्स रेट जाणून घ्या
UAE च्या नवीन कॉर्पोरेट टॅक्स सिस्टीममध्ये, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 84 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकांवर 9 टक्के दराने कॉर्पोरेट टॅक्स लागू केला जाईल. येथे आर्थिक वर्ष 1 जूनपासून सुरू होईल. जर एखाद्याचा व्यवसाय पूर्णपणे UAE मधून चालवला जात असेल तर ती व्यक्ती कुठेही असली तरी त्याला UAE च्या कायद्यानुसारच टॅक्स द्यावा लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://taxguru.in/income-tax/income-uae-taxable-w-e-f-2023.html
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ