IndusInd बँकेने लॉन्च केले पहिले मेटल क्रेडिट कार्ड, त्यामध्ये मिळतील अनेक खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडसइंड बँकेने गुरुवारी आपले पहिले मेटल क्रेडिट कार्ड जारी केले आहे. हे कार्ड पायनियर हेरिटेज (PIONEER Heritage) या नावाने लाँच करण्यात आले आहे. या कार्डच्या मदतीने ग्राहकांना ट्रॅव्हल, वेलनेस, लाईफस्टाइल यासह अनेक खास सुविधा मिळतील. हे कार्ड विशेष प्रोफेशनल्स आणि एंटर प्रेन्योर्सना ध्यानात घेऊन काढले गेले आहे. हे कार्ड वर्ल्ड एलिट प्लॅटफॉर्मचा देखील एक भाग आहे. या कार्डाची खासियत जाणून घ्या.

हे क्रेडिट कार्ड बँक अल्ट्रा-हाय नेटवर्थ सेग्मेंटच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. हे कार्ड जगभरातील श्रीमंत लोकांना विविध प्रकारच्या खास सुविधा पुरवते.

इंडसइंड बँक पायनियर हेरिटेज क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

> या कार्डवर अडीच कोटींचे पर्सनल एअर एक्सीडेंट कव्हर उपलब्ध असेल.
> लेट पेमेंट चार्जेज, कॅश अ‍ॅडव्हान्स फी आणि ओव्हर लिमिट फी लाइफटाइम फ्री असेल.
> आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांच्या लाऊंजमध्ये फ्री एंट्री अनलिमिटेड आहे
> सामान हरवल्यास ग्राहकांना एक लाखापर्यंतचे कव्हर मिळेल.
> ट्रॅव्हल डॉक्यूमेंट हरवल्यास 75 हजार रुपयांचे इन्शुरन्स कव्हर असेल.
> कार्डच्या क्रेडिट लिमिट इतके इन्शुरन्स कव्हर असेल.
> याखेरीज जर आपण वार्षिक 10 लाखाहून अधिक खर्च केला तर फी भरली जाणार नाही.

https://t.co/2Eo4kFEHiU?amp=1

आपण अर्ज कसा करू शकता
या कार्डासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इंडसइंड बँक पायनियर लॉन्जला भेट द्यावी लागेल. याशिवाय आपण आपल्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधू शकता.

https://t.co/rbvKEPGNj9?amp=1

येथे भेट द्या
क्रेडिट कार्डशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण https://bank.indusind.com/pioneer/personal-banking/cards/pioneer-heritgae-credit-card.html येथे भेट देऊ शकता.

https://t.co/XJyQ1G1ZFp?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment