नवी दिल्ली । कोरोना साथीच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशातील परीस्थिती धोक्यात आली आहे. लोकांना ऑक्सिजन, औषध आणि अॅम्ब्युलन्ससाठी वाट पाहावी लागत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ऑटो रिक्षात ऑक्सिजन सिलेंडर वापरुन याचा अॅम्ब्युलन्स म्हणून वापर केल्याचे बर्याच वेळा पाहिले असेल. पण महाराष्ट्रातील पालघरमध्ये शोले या चित्रपटावरून प्रेरित होऊन एक बाईक अॅम्ब्युलन्स बनवली गेली आहे. ज्यामध्ये रुग्णाला स्ट्रेचर, ऑक्सिजन किट, फॅन आणि लाईटची सुविधा देखील देण्यात आली आहे. या अॅम्ब्युलन्सचा फोटो आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तेव्हापासून या शोधाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चला तर मग आपण या बाईक अॅम्ब्युलन्स बद्दल जाणून घेऊयात …
यांच्या मदतीने झाली बाईक अॅम्ब्युलन्सची सुरूवात
महाराष्ट्रात कोरोना साथीच्या दुसर्या लाटेने भयंकर दुर्दशा केली आहे. तेव्हापासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी संस्था रूग्णाच्या सोयीसाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पालघरच्या अॅलर्ट फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने शोले या चित्रपटात जय-विरू (अमिताभ आणि धर्मेंद्र) दुचाकीच्या धर्तीवर बाईक अॅम्ब्युलन्स सुरू केली आहे. जी लोकांमध्ये कुतुहलाची बाब झाली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#शोले फ़िल्म से प्रेरित हो कर महाराष्ट्र पालघर जिले में अलर्ट फोरम और स्टेट बैंक ऑफ इंडिया ने 2 बाइक एम्बुलेंस सेवा की शुरुआत की जिसमे स्ट्रैचर, ऑक्सीजन किट, फैन और लाइट की सुविधा भी है. इसे फर्स्ट रिस्पॉन्डर नाम दिया गया है. कोरोना के दौर में इस नए विचार के साथ मदद सराहनीय है… pic.twitter.com/X2VDSv85A4
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 17, 2021
या सुविधा बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहेत
बाईक अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णाला नेण्यासाठी एक यंत्रणा आहे. यामध्ये रुग्णांना ऑक्सिजन किट, फॅन आणि लाईट अशी आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्याचबरोबर ही अॅम्ब्युलन्स बाईकशी जोडली गेली आहे. गरजेनुसार तिला सहजपणे कोठेही पोहोचता येते.
दीपांशु काबराच्या ट्विटला अनेक लाईक्स मिळाल्या
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर बाईक अॅम्ब्युलन्सचा फोटो शेअर केल्यानंतर आतापर्यंत हे 78 वेळा रीट्वीट केले गेले आहे. यासह या ट्विटला बातम्या लिहिण्यापर्यंत 528 हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा