हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : RBI कडून आतापर्यन्त रेपो दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँका आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करू लागल्या आहेत. सध्याच्या सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात बचत खात्यावरील व्याजदरही सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो आहे.
हे लक्षात घ्या कि, बँकेच्या डिपॉझिट्सवर मिळणारे व्याज (Interest Rates) हे देखील एक प्रकारचे उत्पन्नच आहे. मात्र अलीकडील काही वर्षांत बँकांच्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केले गेले होते. मात्र काही अशा बँका देखील आहेत ज्या ग्राहकांना चांगला व्याजदर देत आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
ICICI बँक
ICICI बँकेकडून आपल्या बचत खात्यातील रकमेवरील व्याजाची गणना दररोज केली जाते म्हणजेच दररोजच्या शिल्लक रकमेच्या आधारावर व्याज दिले जाते. ICICI बँकेने देखील नुकतेच आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल केले आहेत. तसेच या बँकेच्या बचत खात्यामध्ये दिवसअखेर 50 लाख रुपये शिल्लक असल्यास त्यावर 3 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच, यापेक्षा जास्त रकमेच्या डिपॉझिट्सवर 3.50 टक्के दराने व्याज (Interest Rates) दिले जाईल.
HDFC बँक
6 एप्रिल 2022 रोजी HDFC बँकेकडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात (Interest Rates)शेवटचा बदल करण्यात आला होता. आता HDFC बँकेकडून 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या डिपॉझिट्सवर 3 टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर 50 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या डिपॉझिट्सवर 3.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या बँकेतही दररोजच्या शिल्लक रकमेच्या आधारावर व्याजाची गणना केली जाते.
पंजाब नॅशनल बँक
बचत खात्यातील ठेवींवरील पंजाब नॅशनल बँकेचे सध्याचे व्याजदर (Interest Rates) 4 एप्रिल 2022 पासून लागू आहेत. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यावरील डिपॉझिट्सवर 2.7 टक्के व्याज देत आहे. तसेच 10 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट्सवर 2.75 टक्के दराने व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
अलीकडेच SBI कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात (Interest Rates) बदल करण्यात आला आहे. हा बदल 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिपॉझिट्ससाठी केला गेला आहे. त्यानंतर आता बँकेकडून बचत खात्यातील 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या डिपॉझिट्सवर 3 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच, 10 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर 2.7 टक्के व्याज दिले जात आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/savings-bank-deposits
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर