हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : बँकेमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ग्राहकांना बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळेल. हे लक्षात घ्या कि, सध्या देशातील मोठ्या बँकांनी आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता बँकेत पैसे जमा करण्यावर ग्राहकांना जास्त फायदा मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, एफडी आणि आरडी खात्यांवर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याज दिले जाते. मात्र या खात्यांची एक गोष्ट अशी आहे की, यामध्ये ग्राहकांना त्यांना हवे तेव्हा पैसे काढता येत नाही. मात्र बचत खात्यामध्ये ग्राहकांना हवे तेव्हा पैसे काढण्याचे स्वातंत्र्य मिळते.
हे लक्षात घ्या की, ग्राहकांना बचत खात्यावर मिळणारे पैसे हे बँकेने देऊ केलेल्या व्याजदरावर आणि खात्यात दररोज शिल्लक राहिलेल्या शेवटच्या रकमेवरून ठरवले जाते. तसेच संबंधित बँकेच्या निर्णयानुसार हे व्याज मासिक किंवा त्रैमासिकरित्या खात्यामध्ये जमा केले जाते.चला तर मग कोणत्या बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली हे जाणून घेउयात…
PNB
पंजाब नॅशनल बँक बचत खात्यामध्ये जमा केलेली रक्कम 10 लाखांपेक्षा कमी असल्यास 2.70 टक्के तसेच, जर डिपॉझिट्सची रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 2.75 टक्के दराने व्याज देत आहे. Interest Rates
Canara Bank
कॅनरा बँकेने देखील आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. ही बँक आता ग्राहकांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर जास्तीत जास्त 4 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, 21 डिसेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. Interest Rates
Federal Bank
फेडरल बँकेने 8 डिसेंबर 2022 पासून बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. फेडरल बँकेने आता बचत खात्यातील ठेवींवरील व्याज 3 टक्क्यांवरून 3.2 टक्के केले आहे. Interest Rates
SBI
SBI ने बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर 2.70 टक्के केला आहे. जो 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिकच्या डिपॉझिट्सवर लागू असेल.
HDFC Bank
HDFC बँकेकडूनही बचत खात्यातील डिपॉझिट्सवर नवीन व्याजदर लागू केले गेले आहेत. यानंतर आता बँकेकडून 50 लाख रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर 3 टक्के आणि 50 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट्सवर 3.50 टक्के व्याज दर दिला जाईल. Interest Rates
ICICI Bank
ही बँक आता दिवसाअखेर 50 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या रकमेवर 3 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, दिवसाच्या शेवटी, जर ठेव रक्कम 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती 3.50 टक्के दराने व्याज देत आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँकेकडून बचत खात्यांमधील डिपॉझिट्सवरील व्याजाची गणना ही प्रत्येक दिवसाच्या शेवटी खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या शिलकीच्या आधारे केली जाते. Interest Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/interest-rates
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे मिळवा दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन
Investment Tips : कर्ज, इक्विटी किंवा विमा यांपैकी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा कुठे आहे ??? तज्ञांकडून समजून घ्या
नवीन वर्षात PNB च्या ‘या’ FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा 8.10% व्याज
शेतकऱ्यांना लवकरच मिळू शकतील PM Kisan Yojana च्या13 व्या हफ्त्याचे पैसे !!! मात्र पूर्ण करावे लागेल ‘हे’ काम
Financial Changes : 1 जानेवारीपासून ‘हे’ नवे नियम लागू, त्याविषयी जाणून घ्या