नवी दिल्ली । भारतीय महिला दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) महिलांसाठी खास भेट जाहीर केली आहे. महिला घर खरेदीदाराला खूष करण्यासाठी ऑफर देऊन होम लोन वरील व्याज कमी करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. SBI ने एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की,”महिला दिन साजरा करीत असताना SBI ने महिला कर्जदारांसाठी अतिरिक्त 5bps सवलत जाहीर केल्याचा अभिमान आहे.
एसबीआय होम लोन इंटरेस्ट 6.70%
एसबीआय आता होम लोनवर 6.70% व्याज आकारत आहे. तसेच त्यावर कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती दरम्यान स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारच्या होम लोन (Home Loan) वरील प्रक्रिया शुल्क माफ (Waived Processing Fee) केले आहे. महिलांनी योनो या मोबाईल अॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येईल.
बँका स्वस्त लोनद्वारे ग्राहकांना भुरळ पाडत आहेत
यावेळी हाउसिंग सेगमेंट प्रचंड रिकव्हरी दिसून येते आहे. यामुळेच एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या होम लोनचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदराचे युद्ध सुरू केले.
होम लोन बाजारातील 34% हिस्सा
ऐतिहासिकदृष्ट्या कमी व्याजदरासह होम लोन बाजारातील एसबीआयचा वाटा 34 टक्के आहे. एसबीआयने म्हटले आहे की, डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्या होम लोनच्या व्यवसायातील वाट्यात प्रचंड वाढ झाली आहे. नुकत्याच एसबीआयने 5 लाख कोटींच्या होम लोनच्या व्यवसायाचा आकडा पार केला आहे. आता बँकेने आर्थिक वर्ष 2024 पर्यंत होम लोन व्यवसाय 7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.