Spectrum Auction: दूरसंचार विभाग खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पेमेंटसाठी दूरसंचार कंपन्यांना आज नोटीस पाठवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात झालेल्या लिलावामध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पहिल्या मोबदल्यासाठी (Upfront Payment) दूरसंचार विभाग (DoT) दूरसंचार कंपन्यांना (Telecos) मागणी नोट जारी करेल. या स्पेक्ट्रम लिलावात (Spectrum Auction) 855.6 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी 77,800 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या बोली प्राप्त झाल्या. रिलायन्स जिओ (JIO) या रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) सहाय्यक कंपनीने लिलावात सर्वाधिक खर्च केला. जिओने 800 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ आणि 2300 मेगाहर्ट्झ सारख्या बँडमध्ये 488.35 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम 57,122.65 कोटी रुपयांमध्ये विकत घेतला. त्याचबरोबर भारती एअरटेल (Bharti Airtel) ने 355.45 मेगाहर्टझला 18,699 कोटी रुपयांची बोली लावली, तर व्होडाफोन-आयडियाने (Vi) ने 11.90 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम 1,993.40 कोटीमध्ये खरेदी केले.

यशस्वी निविदादारास संपूर्ण रक्कम भरण्यासाठी दोन पर्याय मिळतील
दूरसंचार विभागातील सूत्रांनी सांगितले की, या आठवड्यात तीन कंपन्यांना मागणी नोट पाठवल्या जातील. यामध्ये वाटपासाठी तयार स्पेक्ट्रमसाठी ऍडव्हान्स पैसे देण्याच्या गरजेवर भर देण्यात येईल. स्पेक्ट्रमची वैधता 20 वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाईल. लिलावाच्या अटींनुसार यशस्वी निविदाकार संपूर्ण बोलीची रक्कम एकाच वेळी देऊ शकतात किंवा ठराविक रक्कम ऍडव्हान्स भरण्यासाठीचा पर्याय वापरू शकतात. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) सर्वात मोठा खरेदीदार म्हणून उदयास आला. कंपनीने सर्व 22 मंडळांमध्ये स्पेक्ट्रम वापरण्याचे अधिकार संपादन केले. हा लिलाव केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आयोजित केला होता.

जिओने प्रति मेगाहर्ट्जसाठी 60.8 कोटी रुपये खर्च करून स्पेक्ट्रम मिळविला
बहुतेक सर्कल्समध्ये RJIL कडे सर्वात जास्त सब-गीगाहर्ट्झ स्पेक्ट्रम (Sub-GHz Spectrum) आहेत. इतकेच नाही तर सर्व 22 सर्कल्समध्ये 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये कंपनीचे कमीतकमी 2 एक्स 10 मेगाहर्ट्झ आणि 2300 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 40 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आहेत. कंपनीने प्रत्येक सर्कल्समध्ये आवश्यक असणारा स्पेक्ट्रम मिळविला असून त्याची सरासरी वैधता 15.5 वर्षे आहे. जिओने प्रति मेगाहर्ट्झच्या 60.8 कोटी रुपयांच्या प्रभावी किंमतीने (Effective Cost) स्पेक्ट्रम मिळविला आहे. या अधिग्रहणातून जिओ युझर्सना देखील मोठा फायदा होईल. आता कंपनी देशभरातील लाखो नवीन ग्राहकांना तसेच जुन्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट दूरसंचार सेवा देऊ शकेल.

7 बँडमध्ये 2,308.80 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव 4 लाख कोटींचा आहे
दूरसंचार विभागाने (DoT) केलेल्या स्पेक्ट्रमचा लिलाव बोलीच्या दुसर्‍या दिवशी 2 मार्च 2021 रोजी संपला. यामध्ये एकूण 7 बॅण्डमधील चार लाख कोटी रुपयांचे 2,308.80 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवण्यात आले होते. लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 77,146 कोटी रुपयांच्या बिड प्राप्त झाल्या. दोन्ही दिवशी, 77,800 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या निविदा प्राप्त झाल्या. रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) यांनी यात भाग घेतला. स्पेक्ट्रमचा लिलाव अपेक्षेपेक्षा चांगला असल्याचे सरकारने म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment