Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या

Investment Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्याबाबत खूपच सजग झाला आहे. ज्यासाठी लोकं अनेक प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये रस घेत आहेत. मात्र आपल्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे नेहमीच एक आव्हानात्मक काम आहे. आजकाल बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. मात्र या योजनांमध्ये फायद्यांबरोबरच काही तोटे देखील आहेत. ज्यामुळे अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ उडतो. साधारणतः लोकं फिक्स्ड डिपॉझिट आणि डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र यापैकी नक्की कोण चांगला आणि सुरक्षित रिटर्न देईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. काही लोकांना तर हे दोन्ही एकसारखेच वाटतात. मात्र, प्रत्यक्षात असे नाही. फिक्स्ड डिपॉझिट हे सुरक्षित गुंतवणूक मानले तरीही त्यामध्ये फारसा रिटर्न मिळत नाही.

FD vs Mutual Funds - Investment Comparison | IDFC FIRST Bank

आजपर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, डेट म्युच्युअल फंडांनी एफडीपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. डेट फंडांना अल्प मुदतीची गुंतवणूक असे म्हंटले जाते. तसेच डेट फंडांवर बाजाराशी संबंधित जोखीम देखील परिणाम करते. हे लक्षात घ्या कि, देशातील प्रमुख बँकांकडून 1 ते 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.5 टक्के व्याज दिले जाते. तर, डेट फंडाद्वारे मिळणारा रिटर्न हा बँकेच्या एफडीपेक्षा जास्त असतो. जर आपल्यालाही या दोन्हीपैकी एकामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सर्वात आधी त्यामधून मिळणारा रिटर्न, जोखीम आणि कर आकारणीबाबतची माहिती जाणून घेउयात. Investment Tips

रिटर्न 

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनी हनी फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अनुप भैय्या सांगतात की,” डेट फंडांमध्ये व्याजदर वाढ लवकर होते. कारण सेकेंडरी मार्केटमधील बॉन्‍ड यील्‍डमधील व्याजदरात झटपट बदल होतात. तर, FD वरील व्याजदर हळूहळू वाढतात. तसेच, डेट फंड रिटर्नची गॅरेंटी देत ​​नाहीत. त्याच वेळी, एफडीमध्ये रिटर्नची गॅरेंटी दिली मिळते. Investment Tips

FD vs Mutual Funds- Differences Between them & Where to Invest

जोखीम

सेबीमध्ये रजिस्‍टर्ड इनवेस्‍टमेंट एडवायझर आणि EarthFinPlan.com च्या संस्थापक असलेल्या प्रियदर्शनी मुळ्ये सांगतात की,” फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, डेट फंडांमध्ये अशी कोणतीही गॅरेंटी दिली जात नाही.” Investment Tips

खर्च

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र डेट फंडामधील गुंतवणूकीवर रिकरिंग एक्‍सपेंस रेश्‍यो चार्ज आकारला जातो. जो 1 टक्क्यांपर्यंत असू शकते. Investment Tips

Debt Mutual Fund Vs. Fixed Deposit: Where you should invest? - LXME

टॅक्स

एसके पटोडिया अँड असोसिएट्सच्या असोसिएट डायरेक्टर असलेले मिहिर तन्ना सांगतात की,” डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर यापुढे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा फायदा मिळणार नाही. तो आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या कक्षेत आणला गेला आहे. डेट फंडामध्ये टीडीएस लागू होत नाही. मात्र फिक्स डिपॉझिटमधील व्याजाचे उत्पन्न एका वर्षात 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँकेकडून त्यावर 10% टीडीएस कापला जातो. तसेच टॅक्सच्या कक्षेत न येणाऱ्या करदात्याला TDS वाचवण्यासाठी फॉर्म 15H किंवा 15G सबमिट करावा लागेल. Investment Tips

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/save/deposits/fixed-deposit

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर