हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात, गुंतवणूकदार गुंतवणूकीचे अनेक पर्याय शोधत आहेत. यामध्ये लोकांचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय FD आहे. कारण यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो.
इतकेच नाही तर यामध्ये ठराविक दराने व्याज मिळते ज्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. सध्या रेपो दरात वाढ झाल्यानंतर एफडीमध्ये गुंतवणूक करणे आणखी आकर्षक झाले आहे. गेल्या 3-4 महिन्यांत बँकांकडून FD वरील व्याजदरात लक्षणीयरीत्या वाढ करण्यात आली आहे. ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतो आहे. मात्र, कोणती बँक किंवा वित्तीय संस्था सर्वाधिक व्याज देईल हे शोधावे लागेल. चला तर मग आपण SBI आणि पोस्ट ऑफिसच्या FD बाबतची माहिती जाणून घेउयात… Investment Tips
SBI ची FD
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल SBI कडून UTSAV FD लाँच करण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला 1000 दिवसांसाठी (3 वर्षांपेक्षा थोडे जास्त) गुंतवणूक करता येईल. यामध्ये 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल. तसेच या एफडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 6.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या एफडीद्वारे 10 लाख रुपये जमा करायचे असतील तर 8.35 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. Investment Tips
पोस्ट ऑफिसची FD
पोस्ट ऑफिसकडून पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट (POTD) नावाची एक लहान बचत योजनेची ऑफर दिली जाते. जी बँकेच्या FD प्रमाणेच आहे. तसेच ही सरकार द्वारे चालविली जाणारी योजना आहे. यामध्ये 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. नंतर त्यामध्ये 100 च्या पटीत वाढ करता येईल. या योजनेमध्ये 1,2,3 किंवा 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येईल. यामधील 1-3 वर्षांच्या FD वर 5.5 टक्के व्याज मिळेल.तर 5 वर्षांच्या FD वर 6.7 टक्के व्याज मिळते. या FD मधून 3 वर्षात या एफडीद्वारे 10 लाख रुपये जमा करायचे असतील तर 8.50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, 5 वर्षांत 10 लाख रुपये जमा करायचे असतील तर 7.18 लाख रुपये गुंतवावे लागतील. Investment Tips
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbi.co.in/documents/136/1364568/220822-UTSAV+DEPOSIT.pdf
हे पण वाचा :
FD Rates : आता ‘या’ 2 बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 259% रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा
EPFO : पीएफ खाते क्रमांकामध्ये लपली आहे ‘ही’ खास माहिती, त्याविषयी जाणून घ्या
Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स