नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये कडवी लढत होणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला नव्या दमाची दिल्ली कॅपिटल्स टक्कर देणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने चेन्नईसुपरकिंग्स विरुद्धचा सामना गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स विरुद्धचा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने ५ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची महत्वाची मदार हि सलामी जोडीवर असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्यावर आहे. तर मधल्या फळीत एबी डीव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर बेंगळूरुचा हर्षल पटेलने हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याला अन्य गोलंदाजांची उत्तम साथ भेटली पाहिजे.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि ऑरेंज कॅप परिधान करणारा शिखर धवन हे दिल्लीला उत्तम सुरुवात करुन देत आहेत. मात्र मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिम्रान हेटमायर हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यातच आता रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे पण तरीदेखील अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने दिल्लीला चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे आज विजयाची पंचमी कोण साजरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.