आयपीएल सामन्यांत ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

IPL Fans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल यूएईत घेण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. यामुळे अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे ती म्हणजे प्रेक्षकांना लस घेणे अनिवार्य असणार आहे. बीसीसीआय अधिकारी या संदर्भात लवकरच अमिरात बोर्डासोबत चर्चा करणार आहे.

आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह हे हजर असणार आहेत. या बैठकीमध्ये बीसीसीआयच्यावतीने आगामी टी-२० विश्वचषक आयोजनासाठी भारतातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्याची विनंती करण्यात येणार आहे.

७००-८०० जणांना यूएईत देणार लस
यूएईत लस देण्यासंदर्भात लवकरच बीसीसीआयची अमिरात बोर्डासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी होणारे अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टफ यांना लस देण्यावर चर्चा होणार आहे. इंग्लंड दौरा करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी पहिला डोस भारतात घेतला तर दुसरा डोस इंग्लंडमध्ये देण्यात येणार आहे. यानंतर विराट आणि सहकारी खेळाडू यूएईत दाखल होणार आहे. तर अन्य खेळाडू आणि स्टाफ यांना यूएईत लस देण्यात येणार आहे असे राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. दोन डोसमध्ये २-३ महिन्यांचे अंतर असावे, असा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचा निकष असल्याने लसीकरणासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल असेदेखील शुक्ला म्हणाले.

यूएईमध्ये ७० टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. लस घेतली नसल्यास अन्य देशांच्या नागरिकांना येथे प्रवेश दिला जात नाही. २१ दिवसांच्या कालावधीत सात दिवस प्रत्येकी एक साखळी सामना, दहा डबल हेडर व नंतर दोन क्वालिफायर, एक एलिमिनेटर तसेच फायनल असे चार प्ले ऑफ सामने होतील. त्यासाठी यूएईतील सर्व प्रोटोकॉल पाळले जातील, अशी हमी राजीव शुक्ला यांनी दिली.तसेच ‘प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा निर्णय यूएई सरकार आणि ईसीबीवर अवलंबून असेल. त्यांचा निर्णय बंधनकारक राहील. प्रेक्षकांची अनुपस्थिती आमच्यासाठी चिंतेची बाब नाही.’ असेदेखील राजीव शुक्ला म्हणाले.