दोन्ही ‘कॅप्टन कुल’ आज आमनेसामने; चेन्नईचा विजयीरथ हैदराबाद रोखणार का??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ टॉप ला आहे तर हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानी आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आणि केन विलीयम्सन हे कूल कॅप्टन म्हणून ओळखले जातात.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सलग तीन विजय नोंदवून प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. कोलकाता विरुद्ध रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईचा आत्मविश्वास अजून वाढलेला असेल. फाफ दुप्लेसीस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली अशी फलंदाजी तर शार्दूल ठाकूर, दीपक चहर, असे आक्रमक गोलंदाज ही चेन्नईची जमेची बाजू आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्व चेन्नईला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवते.

तर दुसरीकडे हैदराबाद च्या बाबतीत सर्वच परिस्थिती अवघड आहे. 10 सामन्यात अवघे 2 विजय मिळवत हा संघ शेवटच्या स्थानावर आहे. आक्रमक सलामीवीर जेसन रॉय आणि केन विल्यमसनने मागील सामन्यात विजय मिळवून दिल्याने थोडाफार उत्साह हैदराबादच्या संघात आला असेल. तरी आज त्यांना बलाढ्य चेन्नईचे आव्हान असल्याने सांघिक कामगिरी करावी लागेल.

Leave a Comment