इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना आता मिळणार Whatsapp Banking ची सुविधा

WhatsApp Banking
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp Banking : देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्याअंतर्गत नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आताही पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) आणखी एक पाऊल टाकत ग्राहकांसाठी एक सुविधा देऊ केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना आता WhatsApp वर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी आयपीपीबीकडून एअरटेलसोबत एक करार देखील करण्यात आलेला आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना आपल्या स्मार्ट फोनद्वारे बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. ग्राहकांना ही बँकिंग सेवा Airtel IQ द्वारे मिळवता येईल.

India Post Payments Bank(IPPB) launches WhatsApp Banking Services | SA POST

WhatsApp बँकिंगवर ‘ही’ सुविधा उपलब्ध

आता ग्राहकांना आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आयपीपीबी व्हॉट्सअप सेवा सहजरित्या मिळवता येतील. यामुळे आता ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंगच्या सेवा आणि त्याचे फायदे मिळवता येतील. तसेच आता हिंदी, इंग्रजी भाषांव्यतिरिक्त आपल्या मातृभाषेमध्ये या सेवांची माहिती मिळेल. याद्वारे ग्राहकांना डोअरस्टेप सर्व्हिससाठी जवळच्या पोस्ट ऑफिसचा पत्ताही शोधता येईल. आता लवकरच देशातील इतर महत्वाच्या भाषांमध्येही व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एअरटेल-आयपीपीबी काम करत आहे. Whatsapp Banking

Airtel, India Post Payments Bank launch WhatsApp Banking Services | Biznext  India

ग्रामीण भागातील पुरवली जाणार सेवा

आजकाल पोस्ट ऑफिसच्या अनेक सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत पोहचल्या आहेत. Airtel, IPPB सहीत देशभरातील ग्राहकांसाठी दरमहा 250 लाख मेसेजेस पाठविण्यासाठी आता बँकिंग सेवेच्या माध्यमातून आर्थिक सेवा, बँकिंग सेवांचे मजबूत जाळे केंद्र सरकार तयार करणार आहे. त्यासाठीच WhatsApp सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनसाठी हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. Whatsapp Banking

India Post Payments Bank partners with Airtel to launch banking services on  WhatsApp

WhatsApp सेवेला लवकरच सुरुवात

या योजनेबाबत पत्र सूचना कार्यालयाकडून संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आता लवकरच ग्राहकांना ही सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर अजूनही देण्यात आलेला नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आर्थिक सेवा देण्यासाठी आयपीपीबीकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी IPPB आणि Airtel IQ व्हॉट्सअप सोल्यूशनमध्ये एक लाईव्ह इंटरअ‍ॅक्टिव्ह कस्टमर सपोर्ट एजंट म्हणून काम केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरु करण्यात आली आहे. Whatsapp Banking

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ippbonline.com/web/ippb/sms-banking2

हे पण वाचा :
Maruti Suzuki : कंपनीने घेतला मोठा निर्णय; आजपासून गाड्यांचे किंमतीत झाले बदल, चेक करा..
Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या
Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा
Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार