ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणारी बहुतेक लोकं IRCTC च्या वेबसाइटवरून रिझर्वेशन तिकिटे बुक करतात. आयआरसीटीसी कडून तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना त्यांचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल आयडी विचारले जाते. दररोज लाखो लोकं IRCTC च्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात

रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या आयआरसीटीसीचा वापर 10 कोटींहून जास्त लोकांकडून केलं जातो. यासह या कंपनीकडे जवळपास 11.70 कोटी प्रवाशांचा डेटा आहे. इतर कोणत्याही कंपनीकडे क्वचितच इतक्या लोकांची वैयक्तिक माहिती असेल. मात्र आता IRCTC ला हा डेटा त्यांचा महसूल वाढवण्यासाठी वापरायचा आहे. यावरून सध्या चांगलाच वाद सुरू झाला आहे. अनेकांनी याला सोशल मीडियावर कडाडून विरोध देखील केला आहे.

IRCTC Update: Step-by-step guide to create an account to book train tickets online

गेल्या आठवड्यात काढण्यात आली निविदा

गेल्याच आठवड्यात IRCTC कडून याबाबत एक निविदा काढण्यात आली होती. यामध्ये कंपनीने 1,000 कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबत सांगितले होते. प्रवाशांचा डेटा वापरून पैसे कसे कमवायचे याबाबत हा सल्लागार आयआरसीटीसी ला सल्ला देईल असे त्यामध्ये सांगितले होते. हे लक्षात घ्या कि, प्रवाश्यांचा हा डेटा वापरून आयआरसीटीसी 1,000 कोटी रुपये कमावण्याचे प्लॅनिंग करत आहे. आयआरसीटीसी ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड कंपनी आहे. यावर कमाई वाढवण्यासाठी भागधारकांकडून दबाव वाढतो आहे.

IRCTC To Resume E-Catering Services From Next Month, Here's How To Avail

सोशल मीडियावरही झाला विरोध

रेल्वेकडून गेल्या आठवड्यात या प्रकरणाबाबतची निविदा जारी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी याला गोपनीयतेचा भंग असल्याचे सांगत निषेध केला होता. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, स्वतःच्या फायद्यासाठी रेल्वे प्रवासी आणि मालवाहतूक ग्राहकांची गोळा केलेली माहिती अशा प्रकारे विकू शकत नाही.

IRCTC looks to increase its earnings as more trains back on track | Business Standard News

डेटा विकून पैसे कमविणे ही चांगली कल्पना नाही : तज्ञ

मात्र प्रवाश्यांचा डेटा विकून पैसे कमवण्याची IRCTC ची योजना योग्य नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. प्रवाशांनाही कंपनीचे हे पाऊल आवडलेले नाही. लोकांनाही असे वाटत आहे की ते फक्त तिकीट बुक करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती IRCTC ला देतात. त्यामुळे कंपनी त्यांचा डेटा इतर कोणत्याही कारणासाठी वापरू शकत नाही.

Taking Over From IRCTC, Railways To Now Open Over 100 Food Plazas At Stations To Generate Revenue

निविदा जारी केल्याचा दावा IRCTC ने फेटाळला

सोशल मीडियावर याबाबत तापत चाललेले वातावरण पाहून आयआरसीटीसी ने स्पष्टीकरण देत सावररासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयआरसीटीसी ने ग्राहकांची वैयक्तिक माहिती विकत असल्याचा मीडियाचा दावा फेटाळून लावला आहे. यावेळी कंपनीने म्हटले की” डेटा वापरासाठी फक्त व्यवसायाच्या संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी कोणतीही निविदा काढली नसून ती फक्त ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ असल्याचे म्हटले आहे. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की,” कॉर्पोरेशन आपला डेटा विकत नाही आणि तसे करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.”

विशेष म्हणजे सरकारी कंपनीने ग्राहकांचा डेटा विकून पैसे मिळवण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. याआधीही 2019 मध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी डेटा विकून 65 कोटी रुपये कमावले. यामध्ये लोकांच्या वाहनांचा विमा आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक माहितीचा समावेश होता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :

भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा

Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???