हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनमधील साथीचा रोग ठरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरातील १६,५५८ लोकांचा बळी गेला आहे. जगातील जवळपास सर्व देश या धोकादायक विषाणूच्या चक्रात सापडले आहेत. आतापर्यंत ३८१,६६४ लोक संक्रमित झाले आहेत आणि ही संख्या वेगाने वाढत आहे.सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये (६०७७) त्यानंतर चीन (३,२७७), स्पेन (२,३११) आणि इराणमध्ये (१,८१२) झाले. जर आपण भारताबद्दल बोललो तर आतापर्यंत रुग्णांची संख्या वाढून ४९९ झाली आहे आणि दहा लोक मरण पावले आहेत. देशातील २३ राज्ये असुरक्षित आहेत.
कोरोना विषाणू आपले पाय पसरत असल्याने, यासंदर्भात अफवाही वेगाने पसरत आहे.अफवा पसरण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण करणे, यामुळे परिस्थिती आणखी भयानक बनू शकते.सोशल मिडियावर अफवा पसरत आहेत की कोरोना विषाणू एका अवस्थेत हवेतून पसरू शकतो आणि तसे झाल्यास जगात मोठा विनाश होईल. तथापि, अशा अफवा पूर्णपणे निर्थक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले आहेत.
कोरोना विषाणू हवेतून पसरत नाही.जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ‘कोरोना विषाणूचा प्रसार हवेतुन झालेला नाही आणि बहुधा तो श्वसनातील छोट्या थेंबाने (रेसपिरेटरी डॉप्लेट्स) आणि श्वासोच्छवासाच्या जवळ संपर्कात येण्याने पसरतो.
नोवल कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान समोर आले आहे. सिंह म्हणाले, “हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची कोणतीही बातमी नाही.” आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, कोविड -१९ मुख्यतः श्वासोच्छवासाच्या लहान थेंबांद्वारे (जसे की,आजारी व्यक्तीजेव्हा शिंकतो तेव्हा त्यातून निघणारे लहान थेंब) आणि जवळच्या संपर्काद्वारे पसरतो. म्हणून डब्ल्यूएचओ हात आणि श्वसन स्वच्छतेची शिफारस करण्यास सांगितले. ‘
ते म्हणाले की, चिनी अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिला आहे की आयसीयू आणि सीसीयूमध्ये उच्च घनता असलेल्या एरोसोलच्या संपर्कात येणारी रुग्णालये अशा तुलनेने बंद वातावरणात एरोसोल संक्रमित होऊ शकतात. “तथापि, अशा प्रकारे विषाणूचा कसा प्रसार होतो हे समजण्यासाठी महामारीविज्ञानाच्या आकडेवारीचे अधिक संशोधन आणि विश्लेषण आवश्यक आहे,” ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?
तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न