हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग आत्ता कुठे Corona महामारीच्या विनाशातून सावरतच होते की, ओमिक्रॉनचा आणखी एक नवीन व्हेरिएन्ट BA.5, समोर आला आहे. या नवीन व्हेरिएन्टमुळे अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. WHO च्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, जूनच्या अखेरीस नोंदवलेल्या 52% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनचा BA.5 व्हेरिएन्ट दिसून आला आहे. यूएस मधील सुमारे 65% संसर्गाचे कारण देखील हा व्हेरिएन्टच असल्याचे मानले जाते आहे.
जानेवारी महिन्यात पहिल्यांदा BA.5 समोर आला. तेव्हापासून WHO यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा दिसून आलेला व्हेरिएन्ट ओमिक्रॉन स्ट्रेनचाच एक सिस्टर व्हेरिएन्ट आहे, जो यूएस, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूके मधील प्रकरणांच्या वाढीसाठी जबाबदार आहे. हे लक्षात घ्या कि, WHO च्या आकडेवारीनुसार, गेल्या सलग चार आठवड्यांपासून जगभरात Corona विषाणूची प्रकरणे वाढतच आहेत.
हा व्हेरिएन्ट इतक्या वेगाने का पसरत आहे ???
BA.4, BA.5 व्हेरिएन्ट हे Omicron च्या इतर व्हेरिएन्टप्रमाणेच लस घेऊनही इम्यून सिस्टीममध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. यामुळे Corona मधून बरे झाल्याच्या काही काळानंतरही पुन्हा कोरोना होतो आहे. ग्रेगरी पोलंड, रोचेस्टर, मिनेसोटा येथील मेयो क्लिनिकमधील व्हायरोलॉजिस्ट आणि लस संशोधक यांनी सांगितले की,” त्यांच्याकडे याबाबतचे पुरेसे पुरावे आहेत की, ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्यांना देखील BA.5 ची लागण होत आहे.”
… मात्र फारसा धोकादायक नाही
अनेक देशांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तरीही या व्हेरिएन्ट मधील रुग्णांचा मृत्यू दर खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. हे देखील मोठ्या प्रमाणात Corona लसीवर अवलंबून असते. कारण लस रुग्णाला गंभीर आजारी पडण्यापासून वाचवते. अनेक लस उत्पादक आता ओमिक्रॉनला लक्षात घेऊनच लस अपडेट करण्याचे काम करत आहेत. मात्र WHO च्या अधिकाऱ्यांच्या मते, BA.5 हा इतर कोणत्याही Omicron व्हेरिएन्ट पेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा सध्यातरी नाही. मात्र, प्रकरणांमध्ये अचानक वाढ होऊन आरोग्य सेवेवरील दबाव वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सध्या सुरू असलेल्या महामारीमध्ये अनेक व्हेरिएन्ट पाहायला मिळतील. सध्या जगाला Corona साथीच्या आजारासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. आता जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष भारतात जन्मलेल्या BA.2.75 व्हेरिएन्टवर आहे. कारण तो स्वतःला खूप लवकर बदलतो आणि तो वेगाने पसरु देखील शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.who.int/
हे पण वाचा :
Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
Business Idea : LED बल्ब युनिट बसवून मिळवा लाखोंचा नफा !!!
Mutual Fund द्वारे अशा प्रकारे गुंवणूक करून मिळवून भरपूर रिटर्न !!!