जळगावात नगरसेविकेच्या मुलाला महिलांकडून मारहाण, व्हिडीओ आला समोर

0
151
beaten by women
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप (beaten by women) दिला आहे. पीडित व्यक्ती हि खडसे समर्थक एका नगरसेविकेचा मुलगा आहे. या मारहाणीचा (beaten by women) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे.

पीडित व्यक्तीचे नाव अमीन शेख असे आहे. तो एका नगरसेविकेचा मुलगा आहे. ज्या महिलांनी शेखला मारहाण (beaten by women) केली त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करत व्हायरल केल्याच्या आरोपाखाली महिलांनी त्याला भरचौकात चोप (beaten by women) दिला आहे. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता? असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे.

“आमचे फोटो चुकीच्या पद्धीने व्हायरल केले. त्यामुळे या नालायकाला मी मारेन. त्याने माझ्या गालावरही मारलं आहे. तो खडसे समर्थक आहे. त्याची आई नगरसेविका आहे. तुम्हाला निवडून दिलं तर चांगले कामधंदे करा. सामान्य माणसाला का त्रास देत आहात?”, असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे. भर चौकात हा प्रकार घडल्याने तिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. या मारहाणीचा (beaten by women) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here